शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी 9 नोव्हेंबर रोजी होणार मतदान, पहिल्यांदाच संपूर्ण निवडणुकीत होणार VVPAT चा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 17:15 IST

हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे.

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे.  हिमाचल प्रदेशमध्ये 9 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर मतमोजणी  18 डिसेंबर रोजी होणार आहे.  केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल, असे वृत्त होते. मात्र आज केवळ हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्याच तारखा जाहीर झाल्या. मुख्य निवडणूक आयक्त अचल कुमार ज्योती यांनी आज हिमाचल प्रदेशमधील निवडणूक प्रक्रियेची घोषणा केली.  हिमाचल प्रदेशमध्ये आजपासूनच आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेचे 68 सदस्य असून, तेथे सत्तास्थापनेसाठी सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपा या प्रमुख पक्षांमध्ये चुरस असेल. हिमाचल प्रदेशमध्ये 7 हजार 251 मतदान केंद्रे असतील. राज्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण होईल. मतदान, नामांकन आणि प्रचार फेऱ्यांचे चित्रिकरण होईल.  हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशात प्रथमच संपूर्ण निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार आहे.  मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येईल. त्यासाठी निवडणूक आयोगाने योग्य व्यवस्था केली आहे, एका मतदार संघातील मतपत्रिकांची संपूर्ण मोजणी होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. तसेच इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर दाखवण्यात आले आहे. व्हीव्हीपॅट मशीनवर कुणाला मत दिले आहे. त्याची माहिती मतदाराला मिळेल. 

हिमाचल प्रदेशमधील निवडणूक प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे- 16 ऑक्टोबरपासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल - 23 ऑक्टोबरपर्यंत नामांकन दाखल करता येणार - 24 ऑक्टोबर रोजी नामांकन पत्रांची छाननी- 26 ऑक्टोबर ही नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख असेल - 9 नोव्हेंबर रोजी मतदान - 18 डिसेंबर मतमोजणी  

टॅग्स :ElectionनिवडणूकHimachal Pradeshहिमाचल प्रदेश