शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यासह आईवर कौटुंबिक छळाचा आरोप, अजामिनपात्र वॉरंट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 10:41 IST

Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार विक्रमादित्य सिंह यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी झालं आहे. पत्नीला मारहाण आणि कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी हे वॉरंट जारी झालं आहे.

सिमला -  हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार विक्रमादित्य सिंह यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी झालं आहे. पत्नीला मारहाण आणि कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी हे वॉरंट जारी झालं आहे. राजस्छथानमधील उदयपूरच्या स्थानिक कोर्टामध्ये हे प्रकरण विचाराधीन आहे. तसेच १४ डिसेंबर म्हणजेच बुधवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या प्रकरणामुळे हिमाचल प्रदेशमध्ये मंत्रिपद मिळवण्याच्या शर्यतीत असलेल्या विक्रमादित्य सिंह यांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सिमला ग्रामीण येथील आमदार विक्रमादित्य सिंह यांची पत्नी सुदर्शना चंडावत यांनी पती आणि कुटुंबीयांविरोधात उदयपूरमधील कोर्टामध्ये कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार १७ ऑक्टोबर २०२२ रोजी दिली होती. १७ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीवेळी अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी उदयपूर यांच्या कोर्टाने विक्रमादित्य सिंह, सासू प्रतिभा सिंह, नणंद अपराजिता, नंदोई अंगद सिंह आणि चंडीगडमधील एका तरुणीविरोधीत अजामिनपात्र वॉरंट जारी केले. सर्व प्रतिवादींना उदयपूर कोर्टामध्ये बुधवार १४ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विक्रमादित्य सिंह यांची पत्नी सुदर्शना हिने कौटुंबिक हिंसाचाराबाबतच्या महिला संरक्षण अधिनियम कलम २० अन्वये कोर्टात तक्रार दिली आहे. लग्नानंतर काही दिवसांनी कौटुंबिक हिंसा झाली. तक्रारकर्तीने कोर्टाला विनंती केली की, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हिंसा होऊ नये यासाठी आपल्याला वेगळं घर देण्याचे आदेश सासरच्या मंडळींना द्यावेत.

विक्रमादित्य सिंह यांचा विवाह मार्च २०१९ मध्ये मेवाड राजवंशातील राजकुमारी सुदर्शन चुंडावर हिच्याशी झाला होता. दोघांमध्ये लग्नानंतर काही दिवसांनी मतभेद झाले होते. त्यानंतर बऱ्याच काळापासून ते वेगळे राहत होते.  दरम्यान, विक्रमादित्य सिंह यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.  

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेस