शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Hijab Row: युनिफॉर्मवर कसल्याही प्रकारचा तर्क चालणार नाही, विद्यार्थ्यांना शाळेत 'हे' नियम पाळावेच लागतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 16:29 IST

कर्नाटक उच्च न्ययालयाच्या या निर्णयानंतर, यादगीर येथील सुरपुरा तालुका सरकारी पीयू कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आपला निषेध नोंदवत परीक्षा मधेच सोडली आणि त्या  वर्गातून बाहेर पडल्या.

क्लासरूममध्ये हिजाब घालण्यावरून झालेल्या गदारोळावर आता न्यायालयाचा निर्णय आला आहे. विद्यार्थिनींना क्लासरूममध्ये हिजाब घालण्यास मनाई करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे आणि तो मनमानी पद्धतीने लागू करण्यात आला, हे न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे. एवढेच नाही, तर विद्यार्थ्यांना विहित गणवेशातच शाळा आणि महाविद्यालयात यावे लागेल कारण हा एक वाजवी निर्बंध आहे. यावर विद्यार्थी आक्षेप घेऊ शकत नाहीत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

युनिफॉर्मसंदर्भात लागू असतील हे नियम - - विद्यार्थ्यांना शाळेने निश्चित केलेल्या युनिफॉर्ममध्येच शाळेत यावे लागेल. - शाळा/महाविद्यालय प्रशासनाला एखाद्या आक्षेप असलेल्या युनिफॉर्मवर निर्बंध लादण्याचा अधिकार आहे.- शाळेच्या युनिफॉर्मचे प्रिस्क्रिप्‍शन एक योग्य निर्बंध आहे, यावर विद्यार्थी आक्षेप घेऊ शकत नाहीत.- धार्मिक ओळख असलेल्या कपड्यांवरील निर्बंध जारी राहील.

मुलींचा परीक्षेवर बहिष्कार -कर्नाटक उच्च न्ययालयाच्या या निर्णयानंतर, यादगीर येथील सुरपुरा तालुका सरकारी पीयू कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आपला निषेध नोंदवत परीक्षा मधेच सोडली आणि त्या  वर्गातून बाहेर पडल्या. विशेष म्हणजे, कर्नाटक हायकोर्टाचा निर्णय येताच ही घटना घडली.

असदुद्दीन ओवेसी यांनीही यासंदर्भात ट्विटरवरुन आपली नाराजी जाहीर केली. ते म्हणाले, ''हिजाबबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी मी सहमत नाही. या निकालाशी असहमत असणे हा माझा अधिकार आहे. याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात अपील करतील, अशी मला आशा आहे. मला आशा आहे की केवळ AIMPLBच नाही तर इतरही संघटना या निर्णयाविरुद्ध अपील करतील.''

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCourtन्यायालयMuslimमुस्लीमSchoolशाळा