शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूत 127 वर्षानंतर सर्वाधिक पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 11:04 IST

 बंगळुरूला सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं.  

ठळक मुद्दे बंगळुरूला सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं.  बंगळुरू शहरात सोमवारी रात्री 44.8 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर मंगळवारी सकाळी ही पावसाची नोंद वाढलेली पाहायला मिळाली.मंगळवारी सकाळी बंगळुरू शहरात 128.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बंगळुरू, दि. 16-  बंगळुरूला सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं.  बंगळुरू शहरात सोमवारी रात्री 44.8 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर मंगळवारी सकाळी ही पावसाची नोंद वाढलेली पाहायला मिळाली. मंगळवारी सकाळी बंगळुरू शहरात 128.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे 1890 नंतर 2017 च्या ऑगस्ट महिन्यात सर्वाधीक पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी रात्री अकरा ते बुधवारी सकाळी 4 वाजेपर्यंत पावसाने हा उच्चांक गाठला आहे. एकंदरीतच बंगळुरूमध्ये 127 वर्षांनंतर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

याआधी 27 ऑगस्ट 1890मध्ये बंगळुरूत सर्वात जास्त पाऊस पडला होता. त्यावेळी 162.1 मिमी पावसाची नोंद झाली होती. कर्नाटक राज्य आपत्ती देखरेख कक्षाच्या माहितीनुसार 1890नंतर आता 2017मध्ये इतक्या रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. कर्नाटक राज्य आपत्ती देखरेख कक्षाच्या माहितीनुसार सोमवारी रात्रीपासून 184 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

आणखी वाचा

राज्यात 3 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

महापुरामुळे बिहारमध्ये आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू 

सोमवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा शहराच्या विविध भागांमध्ये तडाखा बसला. शहरामधील सखल भागात ठिकठिकाणी पाणी जमल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी रात्री सुरू झालेला हा पाऊस मंगळवारी सकाळीसुद्धा तितकाच बरसत होता. त्यामुळे शहरातील जनजीवनावरही त्याचा परिणाम झाला. शहरात असणाऱ्या यदियार तलावातून संरक्षण भिंत ओलांडून पाणी वाहत होतं. तर बेलंदूर तलावातील पाणी आसपासच्या परिसरात शिरलं होतं. कोरामंगल भागातील सखल भागात पाणी साचल्याने तेथे  बचावासाठी 40 बचाव बोटी उतरल्या होत्या. तसंच जयानगर, कोरामंगल आणि बॅनरघट्टा रोडवर तुंबलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी अग्मिशामक दलाला पाचारण करण्यात आलं होतं. तसंच राजराजेश्वरी नगर, जेपी नगर, नगरभवी, थानिसंद्रा, उत्तराहल्ली आणि पुत्तनाहल्ली या भागात असलेल्या घरांमध्ये साप शिरल्याच्या तक्रारी करणारे फोन वन्यजीवन स्वयंसेवकांना करण्यात आले होते. 

मंगळवारी स्वातंत्र्य दिन असल्याने शाळा आणि ऑफिसला सुट्टी होती त्यामुळे बंगळुरूमधील लोकांना घराबाहेर पडावं न लागल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. पण सोमवारी रात्रपाळीसाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्यांना मंगळवारी सकाळी घरी परतत असताना या मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला.