शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका,  दुर्गा विसर्जनावरुन ममता बॅनर्जींना हायकोर्टानं फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 09:10 IST

पश्चिम बंगालमध्ये मूर्ती विसर्जनावरुन सुरू असलेल्या विवादासंदर्भात कोलकाता हायकोर्टानं ममता बॅनर्जी सरकारला जोरदार फटकारले आहे.

नवी दिल्ली, दि. 21 - पश्चिम बंगालमध्ये मूर्ती विसर्जनावरुन सुरू असलेल्या विवादासंदर्भात कोलकाता हायकोर्टानं ममता बॅनर्जी सरकारला जोरदार फटकारले आहे. या वादावर तीव्र शब्दांत टीका करुन कोर्टानं म्हटले की, तुम्ही दोन समुदांमध्ये फूट का पाडत आहात. दुर्गा पूजा आणि मुहर्रम सणासंदर्भात राज्यात यापूर्वी अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली नाही''. दरम्यान, या प्रकरणावर कोर्ट गुरुवारी निर्णय घेणार आहे.  

नेमका काय आहे प्रकार ?दरम्यान, काही दिवसांपूर्वी  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या सणाच्या पार्श्वभूमीवर चेतावणी देताना सणांच्या नावाखाली राजकारण खपवून घेतलं जाणार नाही,  असं म्हटले होते. तसंच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुहर्रमच्या दिवशी दुर्गाविसर्जन होणार नाही हे स्पष्ट केले होते. याआधीही ममता बॅनर्जी यांनी मुहर्रमच्या दिवशी दुर्गा विसर्जन करू नये आणि हिंदू व मुस्लीमांनी सौहार्दाचं वातावरण ठेवावं असं आवाहन केलं होतं. ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, 'दुर्गापूजेदरम्यान कोणतीही हिंसा खपवून घेतली जाणार नाही. मुहर्रमदरम्यान मूर्ती विसर्जन होणार नाही. सणांच्या नावाखाली होणारी हिंसा खपवून घेतली जाणार नाही'. पश्चिम बंगालमध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे हा महिना संवेदनशील असणार आहे. या वर्षी दस-च्या दुसऱ्या दिवशी मुहर्रम येत आहे. याच दिवशी दुर्गा विसर्जन करण्यात येतं. त्यामुळे दोन्ही मिरवणुका समोरासमोर आल्या तर तणावाचं वातावरण होऊ शकतं, अनुचित प्रकार घडू शकतात, त्यामुळे दुर्गा मूर्ती विसर्जन या दिवशी न करण्याचं आवाहन बॅनर्जी यांनी केलं होतं. एकमेकांना सहकार्य करा आणि सौहार्दाचं वातावरण राखा, असंही त्यांनी म्हटलं होतं. धार्मिक तेढ निर्माण व्हावं यासाठी काही घटक लोकांना भडकवतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त करताना त्याचा राजकीय फायदाही उठवला जाईल, अशी शक्यता बॅनर्जी यांनी उपस्थित केली होती. दुर्गा पूजा समितींची त्यांनी बैठक बोलावली होती, यावेळी त्यांनी ही मते व्यक्त केली होती. काही जण राजकीय लाभ पदरात पाडण्यासाठी झटत आहेत, अशावेळी आपण कशाला अंगावर बालंट घ्यायचं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.बॅनर्जी यांनी पोलीस अधीक्षकांना राज्यभरात जिल्हा पातळीवरील दुर्गा समित्यांशी व मुहर्रम समित्यांशी चर्चा करण्याचे आदेश दिले होते. 1 ऑक्टोबर रोजी मुहर्रम आहे आणि त्याचदिवशी पारंपरिकरीत्या दुर्गा मूर्ती विसर्जनाचा दिवस यंदा येत आहे. रेड रोड कार्निवल 3 ऑक्टोबर रोजी करण्याचे व दुर्गा विसर्जनासाठी 4 ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्याचे त्यांनी सांगितले होते. समाजात तेढ वाढेल अशा सोशल मीडियातील पोस्टना बळी पडू नका, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.  

टॅग्स :Muslimमुस्लीम