शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

तमिळनाडूत 'राष्ट्रगीता'वरून हायव्होल्टेज ड्रामा! राज्यपाल विधानसभेतून बाहेर पडले; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:06 IST

विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करत तमिळनाडूच्या राज्यपालांनी थेट सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले.

तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या सरकारमधील वाद आता टोकाला पोहोचला आहे. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करत राज्यपालांनी थेट सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले. तामिळ गीतासोबतच राष्ट्रगीतही वाजवले जावे, ही राज्यपालांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावल्याने हा पेच निर्माण झाला आहे.

नेमकं काय घडलं सभागृहात?

विधानसभेच्या सत्राची सुरुवात परंपरेनुसार तामिळ गीताने झाली. मात्र, राज्यपालांनी आग्रही मागणी केली की तामिळ गीतासोबतच राष्ट्रगीतही वाजवले गेले पाहिजे. या मागणीवरून विधानसभा अध्यक्ष अप्पावू आणि राज्यपाल यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. अध्यक्षांनी ही मागणी मान्य करण्यास नकार दिल्यानंतर, संतापलेल्या राज्यपालांनी अभिभाषण न करताच सभागृहातून काढता पाय घेतला.

"राष्ट्रगीताचा सन्मान राखला गेला नाही"

सभागृहाबाहेर पडल्यानंतर राज्यपालांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. "राष्ट्रगीताला योग्य सन्मान दिला जात नाही, याचे मला प्रचंड दुःख वाटते. माझ्या अभिभाषणात वारंवार अडथळे आणले गेले. मला माझ्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे, पण राष्ट्रगीताचा सन्मान हा सर्वतोपरी असायला हवा," असे आर. एन. रवी यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, "बोलताना माझा माईक बंद करून माझा अपमान करण्यात आला," असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

सलग तिसऱ्या वर्षी बहिष्कार

आर. एन. रवी यांनी तमिळनाडू विधानसभेच्या सत्रावर बहिष्कार टाकण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०२४ आणि २०२५ मध्येही त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांशी असहमती दर्शवत अभिभाषण देण्याचे टाळले होते. राजभवनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सरकारवर असहकार्याचा आरोप करण्यात आला आहे.

विधानसभा अध्यक्षांचे प्रत्युत्तर

राज्यपालांच्या आरोपांवर विधानसभा अध्यक्ष अप्पावू यांनी तात्काळ स्पष्टीकरण दिले. "विधानसभेत केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना त्यांचे विचार मांडण्याची मुभा असते. कोणीही आपल्या अटी सभागृहावर लादू शकत नाही. सरकारने राज्यपालांच्या भाषणाची सर्व तयारी केली होती, पण त्यांनी स्वतःच नकार दिला," असे अध्यक्षांनी ठणकावून सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Tamil Nadu Assembly Drama: Governor Walks Out Over National Anthem Row

Web Summary : Tamil Nadu Governor R.N. Ravi exited the assembly after a dispute over playing the national anthem alongside a Tamil song. He alleged disrespect towards the anthem and claimed his microphone was muted. This marks his third assembly boycott amid disagreements with the state government.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूNational Anthemराष्ट्रगीतIndiaभारत