शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अरेरे! प्रेयसीसोबत पतीला रंगेहाथ पकडलं, संतापलेल्या पत्नीने दोघांना चपलेने धू धू धुतलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 11:15 IST

संतापलेल्या महिलेने आपल्या पतीला चपलेने मारहाण केलीच पण प्रेयसीलाही बेदम मारहाण केली.

मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पतेरी परिसरात पती-पत्नी आणि प्रेयसीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. हायव्होल्टेज ड्रामा सुरू असताना पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. महिला आपल्या माहेरची मंडळी आणि पोलिसांसह एका घरात पोहोचली आणि तिने पतीला चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेने पतीसोबत उपस्थित असलेल्या अन्य एका महिलेलाही मारहाण केली.

मारहाण करत असलेल्या महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत आणि तो तिला घटस्फोट देण्याचा विचार करत आहे. महिलेला याचा त्रास होत होता आणि ती बराच दिवसापासून पती आणि त्याच्या प्रेयसीवर नजर ठेवून पुरावे गोळा करत होती. शेवटी तिने दोघांना रंगेहाथ पकडलं.

संतापलेल्या महिलेने आपल्या पतीला चपलेने मारहाण केलीच पण प्रेयसीलाही बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ महिलेच्या कुटुंबीयांनी बनवला होता, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचवेळी ही घटना घडत असताना घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचारी देखील होते. या प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. "मी गेल्या तीन वर्षांपासून माहेरी राहत आहे. माझा नवरा मला न्यायला आला नाही. मी स्वत:हून सासरी परत आले. तर तो मला परत का आलीस असा सतत प्रश्न विचारत होता. तसेच पुन्हा माहेरी जाण्यास सांगत होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत माझ्याशी भांडत राहायचा. मग मी एक दिवस रात्री त्याला फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं. मला संशय आला आणि मी तपास सुरू केला."

"शोध घेतल्यानंतर मला त्याचं अफेअर असल्याचं समजलं. म्हणूनच तो घटस्फोटासाठी माझ्यावर दबाव टाकत होता. शिवीगाळ करत होता. आम्ही आधी त्याच्याविरोधात पुरावे गोळा केले. त्यानंतर मी नवरा आणि त्याच्या प्रेयसीला सतनामध्ये रंगेहाथ पकडलं. अखेर पोलिसांच्या मदतीने दोघांनाही पकडण्यात यश आलं" अशी माहिती महिलेने दिली आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश