शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

CM अरविंद केजरीवालांना उच्च न्यायालयाचा झटका, अटकेपासून दिलासा देण्यास नकार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 19:48 IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अटकेविरोधात दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली.

Arvind Kejriwal Arrest: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. केजरीवालांनी त्यांच्या अटकेविरोधात दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली. न्यायालयाने म्हटले की, ईडीने या प्रकरणात काही पुरावे गोळा केले असतील, त्यामुळे ईडीचे म्हणणे ऐकल्याशिवाय आम्ही यावर निर्णय घेऊ शकत नाही. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 एप्रिल रोजी होणार आहे. सकाळी सीएम केजरीवाल आणि ईडीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

दिल्ली उच्च न्यायालयानेअरविंद केजरीवाल यांना अटकेपासून दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. यासोबतच ईडीलाही केजरीवाल यांच्या याचिकेवर 2 एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. सविस्तर सुनावणी झाल्याशिवाय आदेश देता येणार नाहीत, असे दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ एप्रिल रोजी होणार आहे. 

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टात याचिका दाखल करुन त्यांची अटक बेकायदेशीर असून, त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. केजरीवाल यांच्या बाजूने वकील अभिषेक मनू सिंघवी, तर ईडीच्या बाजूने वकील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी युक्तिवाद केला. दुपारी दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आता न्यायालयाने आपला निर्णय देत केजरीवांना धक्का दिला.

केजरीवाल 28 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत दिल्लीतील कथित अबकारी धोरण प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या ईडीने 21 मार्चला सलग 9 समन्स पाठवल्यानंतर केजरीवाल यांना त्यांच्या घरातून अटक केली होती. 21 मार्चच्या संध्याकाळी ईडीचे पथक 10व्या समन्ससह केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. घराची झडती घेतल्यानंतर टीमने केजरीवाल यांना त्यांच्या घरातून अटक केली आणि त्यांना ईडीच्या मुख्यालयात नेले. यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 22 मार्चला ईडीने मुख्यमंत्र्यांना राऊस एव्हेन्यू येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने केजरीवालांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयHigh Courtउच्च न्यायालय