शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

'लव्ह जिहाद' वर हाय कोर्टाचा मोठा निर्णय, फक्त लग्नाच्या आधारावर FIR दाखल करता येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 15:08 IST

Love Jihad Gujarat: गुजरात उच्च न्यायालयने म्हटले की, फक्त विवाहाच्या आधारावर एफआयआर नोंदवता येणार नाही.

अहमदाबाद: 'लव्ह जिहाद'बाबतगुजरातमध्ये करण्यात आलेल्या कायद्यावर उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. कोर्टाने स्पष्ट केले आहे की केवळ विवाहाच्या आधारावर या प्रकरणात एफआयआर नोंदवता येणार नाही. या वेळी न्यायालयाने गुजरात धर्म स्वातंत्र्य (सुधारणा) कायद्याच्या काही कलमांमध्ये केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीवर स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. अलीकडेच, उच्च न्यायालयाने गुजरात धर्म स्वातंत्र्य (सुधारणा) कायद्याशी संबंधित याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्य सरकारला नोटीस पाठवली होती.

गुजरात उच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले की, आंतरधर्मीय विवाहाच्या बाबतीत केवळ विवाहालाच एफआयआरचा आधार बनवता येत नाही. विवाह बळजबरीने किंवा लोभाने झाल्याचे सिद्ध केल्याशिवाय पोलिसांकडे एफआयआर नोंदवता येत नाही. न्यायालयाच्या वतीने कायद्याच्या कलम 3, 4, 5 आणि 6 च्या सुधारणांची अंमलबजावणी थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्य सरकारला नोटीस

गुजरात उच्च न्यायालयाने 6 ऑगस्ट रोजी लग्नाद्वारे सक्तीने किंवा फसव्या धर्मांतराला प्रतिबंधित करणाऱ्या नवीन कायद्याच्या तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर राज्य सरकारला नोटीस बजावली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती बिरेन वैष्णव यांच्या विभागीय खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्यास सांगितले होते.

जमीयत उलेमा-ए-हिंदच्या गुजरात शाखेने गेल्या महिन्यात गुजरात धर्म स्वातंत्र्य (सुधारणा) अधिनियम, 2021 च्या विरोधात याचिका दाखल केली होती. हा कायदा 15 जून रोजी अधिसूचित करण्यात आला होता. व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान, जमीयत उलेमा-ए-हिंदचे बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मिहीर जोशी यांनी सुधारित कायद्यांमध्ये अस्पष्ट अटी असून, या विवाहाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

टॅग्स :GujaratगुजरातHigh Courtउच्च न्यायालयLove Jihadलव्ह जिहाद