शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुंबईतही आता हायटेक प्रयोगशाळा; कोरोना चाचण्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 07:07 IST

कोरोना चाचण्यांची क्षमता वाढणार : यांत्रिक पद्धतीने होणार काम, रिअल टाइम देखरेख

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे, तर शहर-उपनगरांत आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिककोरोना चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून चाचण्यांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उद्घाटन केलेल्या परळ येथील आयसीएमआर-राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत अद्ययावत प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.

या प्रयोगशाळेत दिवसाला तीन पाळ्यांमध्ये कोविडच्या १२०० चाचण्या केल्या जातील. या प्रयोगशाळेत ऌ्रॅँ ळँ१ङ्म४ॅँस्र४३ उडश्कऊ-19 ही सुविधा आहे. येथील संपूर्ण प्रक्रिया यांत्रिक पद्धतीने होत असल्याने चाचणीचा वेग तर वाढतोच शिवाय प्रत्यक्ष हाताळणी न झाल्याने या केंद्रातील व्यक्ती सुरक्षित राहतात. एकदा नमुने या यंत्रात टाकले की कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय किंवा अडथळ्याशिवाय प्रक्रिया सुरू होते आणि अव्याहतपणे सुरू राहते. रिमोट एक्सेस पद्धतीने चाचणीचे अहवाल आणि विश्लेषण प्राप्त होते. यात प्रक्रियेवर रिअल टाइम देखरेख ठेवता येते.

या नव्या प्रणालीत इतर रोगांना कारणीभूत ठरणारे जीवाणू किंवा विषाणू यांच्याबाबतीतदेखील नमुन्यांची चाचणी करता येते, जसे की, एचआयव्ही, एचसीव्ही, सीएमव्ही सद्य:परिस्थितीत राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधानमध्ये आरटीपीसीआरवर आधारित प्रयोगशाळेत २०० चाचण्या दिवसाला होऊ शकतात. महामारीनंतर हेपेटायटीस बी आणि सी, एचआयव्ही, मायक्रोबॅक्टेरियम क्षयरोग, सायटोमेगाल व्हायरस, क्लेमिडिया, निसेरिया आणि डेंग्यू चाचणी घेण्यास सक्षम असतील.

कोलकाता, नोएडातही प्रयोगशाळापरळमधील या संस्थेने नुकतीच ५० वर्षे पूर्ण केली असून देशातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला जन्माला घालण्याचा मान या संस्थेकडे जातो. मुंबई सोबतच सोमवारी कोलकाता आणि नोएडा येथील हायटेक प्रयोगशाळांचेही उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या