शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विपरीतलिंगी व्यक्तींचीही अधिकारीपदी सशस्त्र पोलीस दलात होणार भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 23:08 IST

यूपीएससी परीक्षेसाठी परवानगी देण्याचा सरकारचा विचार

नवी दिल्ली : विपरीतलिंगी व्यक्तींची (ट्रान्सजेंडर्स) केंद्रीय निमलष्करी दलात लढाऊ सैनिकांचे नेतृत्व करण्याची इच्छा लवकर पूर्ण होऊ शकते. देशांतर्गत विविध सुरक्षेसाठी तैनात केल्या जाणाऱ्या या दलात अधिकारी म्हणून ट्रान्सजेंडर्स व्यक्तींची भरती करण्यासाठी त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षेला बसण्याची परवानगी देण्याबाबत सरकार विचार करीत आहे.

सुरक्षा आस्थापनामधील सूत्रांनी सांगितले की, केंद्र सरकारने मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्क संरक्षण) अधिनियम अधिसूचित केला आहे. त्यानुसार सर्व क्षेत्रांसह सशस्त्र दलातही त्यांना समान संधी देणे जरूरी आहे. गृहमंत्रालयाने निमलष्करी किंवा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाकडून अभिप्राय मागितला आहे. जेणेकरून यावर्षी असिस्टंट कमांडंटस्परीक्षेसाठी प्रकाशित केल्या जाणाºया अधिसूचनेत ट्रान्सजेंडर श्रेणीचा समावेश करावा की नाही, यासंदर्भात केंद्रीय लोकसेवा आयोगाला कळविता येईल.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा बलात (एसएसबी) सहायक समादेशक(असिस्टंट कमांडंट) हे पद प्रवेशस्तरीय अधिकारी पदाचे आहे.केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, सशस्त्र दलाने अधिकारी पदासाठी ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी उभी ठाकणारी आव्हाने आणि संधीबाबत चर्चा केली आहे. कोणत्याही लिंगाची व्यक्ती पात्रता आणि बुद्धिकौशल्याच्या आधारावर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात सामील होऊ शकते, तसेच अधिकारी म्हणून नेतृत्व करण्यासाठी वैद्यकीय, मानसिक आणि शारीरिक पात्रता चाचणीत यशस्वी व्हावे लागेल.

टॅग्स :Policeपोलिसupscकेंद्रीय लोकसेवा आयोग