शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:36 IST

निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील गोंधळावरून एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधींपासून ते राज ठाकरेंपर्यंत सारेच टीका करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक आयोगाने फोन करणे हे ज्ञानेश कुमार यांना सुखद धक्का देणारे ठरले आहे.

बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असताना, भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक आयोगाचा फोन आला आहे. त्यांना भारताच्या पारदर्शक निवडणूक प्रणालीचा अभ्यास करायचा आहे, यासाठी ते आपले खासदार पाठविणार आहेत. 

निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील गोंधळावरून एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधींपासून ते राज ठाकरेंपर्यंत सारेच टीका करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक आयोगाने फोन करणे हे ज्ञानेश कुमार यांना सुखद धक्का देणारे ठरले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक आयोगाचे अध्यक्ष मोसोथो मोएपिया यांनी कुमार यांना फोन करून बिहार निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

दक्षिण आफ्रिकेचे खासदार जगातील सर्वात पारदर्शक आणि प्रभावी मानल्या जाणाऱ्या निवडणूक प्रणालीची जवळून माहिती घेण्यासाठी लवकरच भारताला भेट देण्याचा विचार करत असल्याचे मोएपिया यांनी सांगितले. 

निवडणूक आयोग सध्या वादात...जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचा निवडणूक आयोग सध्या वादात सापडलेला आहे. राहुल गांधींपासून ते राज ठाकरेंपर्यंत सारेच विरोधक मतदार यादी स्वच्छ करण्यास सांगत आहेत. एकाच मतदाराची अनेकदा नावे, एकाच घरात हजारावार मतदार नोंदणी, एकाच फोटोचे अनेक मतदार असे अनेक घोटाळे समोर आणत आहेत. खोट्या पत्त्यांनी, फोटोंद्वारे अनेक मतदार नोंदविले जात आहेत. या सर्वांची नावे वगळून दोषमुक्त मतदार यादी तयार करावी अशी मागणी करत आहेत. अशातच महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामुळे देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Amidst Opposition's Criticism, African Election Body to Study Indian System

Web Summary : While Indian opposition criticizes voter list issues, South Africa's election commission seeks to study India's transparent election system. South African officials will soon visit India to learn about its electoral process. This comes as local elections are announced in Maharashtra.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSouth Africaद. आफ्रिका