शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून शशी थरूर यांचा पराभव; जी-२३ गटात पडली होती फूट; प्रियांकांचा प्रचारही कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 08:49 IST

Shashi Tharoor : अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज भरताना खरगे यांना काँग्रेसच्या कार्यकारी समितीतील अनेक नेत्यांनी अनुमोदन दिले होते.

- आदेश रावल

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांचा पराभव होण्यामागे प्रियांका गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांचा केलेला प्रचार असल्याची चर्चा आहे. खरगे यांच्या तुलनेत थरूर यांना केवळ १० टक्के मते मिळाली होती.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज भरताना खरगे यांना काँग्रेसच्या कार्यकारी समितीतील अनेक नेत्यांनी अनुमोदन दिले होते. खरगे हे परिवाराचे उमेदवार असल्याचाच संदेश त्यातून गेला होता. या निवडणुकीत स्वतः सोनिया गांधी यांनी कोणतेही भाष्य केले नाही. दुसरीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रेत गुंतलेले होते. 

मात्र, प्रियांका गांधी यांनी खरगे यांच्यासाठी छुपा प्रचार केला आणि त्यांनी जी- २३ गटातील वरिष्ठ नेत्यांना फोन करून काँग्रेस हायकमांडचा संदेशही पोहोचवला होता. थरूर यांना पक्षात येऊन दोन दशकेही झाली नसल्याची भावना जी- २३ गटातील नेत्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ नेत्यांकडून अध्यक्षपदासाठी थरूर यांना पाठिंबा कसा मिळणार?

जी- २३ मधील नेत्यांनी थरूर यांचे समर्थन का नाही केले?- थरूर यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा करण्याआधी कोणत्याही नेत्याशी चर्चा केली नव्हती. त्यापूर्वी गुलाम नबी आझाद आणि कपिल सिबल यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. या गटातील नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांना हरयाणा काँग्रेसची धुरा देऊन हायकमांडने आपल्या बाजूने करून घेतले होते.- मनीष तिवारी आणि आनंद शर्मा हे दोघेही विदेशी विषयांतील तज्ज्ञ मानले जातात. थरूरही याच विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यामुळे तिवारी आणि शर्मा यांच्याकडूनही त्यांना समर्थन मिळणेही दुरापास्त होते.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेस