जैसलमेर : दुश्मनांच्या रणगाड्यांना आकाशातून भेदू शकणारे मिसाईल भारताने बनविले आहे. या मिसाईलला उपग्रहांद्वारे त्याच्या लक्ष्याचा मार्ग दाखविता येणार आहे. या मिसाईलचे नाव आहे 'हेलिना'. याचे नुकतेच यशस्वी परिक्षण करण्यात आले.
'हेलिना' हे एक गायडेड सिस्टिमवर चालणारे मिसाईल आहे. हवाई दलाने नुकतेच या स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन (SAAW) ची चाचपणी केली. त्याने दोन प्रकारच्या वातावरणात जमिनीवरील लक्ष्यांना अचूक भेदले आहे. राजस्थानच्या पोखरणमध्ये या मिसाईलचे परिक्षण करण्यात आले. महत्वाचे म्हणजे भारताने पहिल्या अणुबॉम्बची चाचणी याच ठिकाणी घेतली होती.
हेलिनाची वैशिष्टे :
- नाग या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाइलचे हेलिकॉप्टरमध्ये वापरता येणारे व्हर्जन
- 7 ते 8 किमीवरील लक्ष्याला अचूक भेदण्याची क्षमता
- एचएएल ध्रुव और एचएएल लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरमध्ये वापरू शकणार