शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

देशातील अनेक भागांत धो-धो पाऊस, बिहारमध्ये ८० लाख लोकांंना पुराचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 06:52 IST

महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यात काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : देशात अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक नद्यांना पूर आलेला आहे. पूर्वाेत्तर भारताचा काही भाग एक महिन्यापासून पुराचा सामना करीत आहे. राजस्थानात पाऊस आणि पुराने सात जणांचा बळी घेतला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यात काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.बिहारमध्ये पुराचा ८० लाख लोकांना फटका बसला आहे, तर आतापर्यंत २५ जणांचा पावसाशी संबंधित दुर्घटनांत मृत्यू झाला आहे. पूर्वाेत्तरमध्ये आसामच्या धेमाजी, लखीमपूर आणि बक्सामध्ये जवळपास १२ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. हवामान विभागाने सांगितले की, उत्तर पश्चिम आणि पश्चिमोत्तर भागात येत्या दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अधिकाऱ्यांना उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत. एनडीआरएफच्या टीम तीन जिल्ह्यांसाठी व एसडीआरएफच्या टीम २० जिल्ह्यांसाठी तैनात केल्या आहेत.चुरू आणि नागौरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ओडिशाच्या काही भागांत १३ आॅगस्टपासून पूरस्थिती आहे. महाराष्ट्रात कृष्णा, वारणा आणि कोयनाची पाणीपातळी वाढली आहे.>आंध्रात अनेक गावे जलमयआंध्र प्रदेशात अनेक गावे अद्यापही जलमय आहेत. मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी परिस्थितीची माहिती घेतली आणि जिल्हाधिकाºयांना निर्देश दिले की, पूरग्रस्त भागातील लोकांना तात्काळ प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत केली जावी.>उत्तर प्रदेशात १५ जिल्ह्यांत पूरउत्तर प्रदेशात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागात लोकांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या १५ आणि एसडीआरएफ व अन्य अशा एकूण २२ टीम काम करीत आहेत. पूरग्रस्त भागात धान्याचे कीट पुरविण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पश्चिम मध्यप्रदेशात आगामी तीन ते चार दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे.