शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंड, हिमाचल अन् दिल्लीत पावसाचे थैमान; यमुनेसह बहुतेक नद्यांना उधाण, अनेकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 08:50 IST

दिल्लीत अनेक ठिकाणी सोमवारी शाळांना सुटी देण्यात आली. 

नवी दिल्ली: उत्तर भारतात मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. दिल्ली, हिमाचल, उत्तराखंडसह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्लीत पावसाने ४१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १९८२ पासून जुलैमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक १५३ मिमी पाऊस झाला. देशभरात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत लष्कराच्या दोन जवानांसह १६ जणांचा मृत्यू झाला. यमुनेसह बहुतेक नद्यांना उधाण आले आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी सोमवारी शाळांना सुटी देण्यात आली. 

उत्तराखंडची परिस्थिती सुद्धा सारखीच आहे. राज्यात गेल्या २४ तासांत सरासरीपेक्षा २.५ ते ३ पट जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने रस्ते बंद झाले असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत असून चार धाम यात्रेलाही अडथळा निर्माण होत आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देत लोकांना अनावश्यक हालचाली टाळण्यास सांगितले.

हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे २५० हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहने वाहून गेली. कोटगढच्या माधवनी पंचायतीच्या पानेवली गावात एका घरावर दरड कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला, इतर दोन दुर्घटनांत दोघांचा मृत्यू झाला. पुरामुळे अनेक ठिकाणचे पूलही वाहून गेले आहेत. उत्तर रेल्वेनुसार सुमारे १७ गाड्या रद्द करण्यात आल्या, तर बारांचा मार्ग वळवण्यात आला. हिमाचल प्रदेशातील कांगडा, चंबा, हमीरपूर, कुल्लू, मंडी येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोलन, शिमला, सिरमौरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून लाहौल स्पितीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लाहौल स्पितीच्या लोसारमध्ये हिमवृष्टीमुळे तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे.    

यमुनेच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे

राजधानीत यमुनेच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दिल्लीच्या जुन्या लोखंडी पुलाजवळ यमुना धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचली आहे. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १ वाजता यमुनेची पाण्याची पातळी २०३.१८ मीटर होती. इशारा पातळी २०४.५ मीटर आहे, जी मंगळवारी २०५.३३ मीटर पार करेल. त्यामुळे राजधानीतील सखल भागात पुराचा धोका वाढला असून त्यामुळे येथील सुमारे ३७ हजार लोक प्रभावित होऊ शकतात. दुसरीकडे हरियाणातून आणखी पाणी सोडल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते.   

यात्रेकरूंची जीप नदीत पडली

ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर गुलरजवळ दरड कोसळल्याने तीन भाविकांची जीप नदीत पडल्याने गंगेत बुडाले. राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जीपमध्ये ११ जण होते. त्यांनी सांगितले की, पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर इतर तिघांचा शोध सुरू असून बचाव कर्मचार्‍यांनी तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. राज्याच्या काशीपूर भागात दोन घरे कोसळून एका जोडप्याचा मृत्यू झाला, तर त्यांची नात जखमी झाली, तर उत्तरकाशी जिल्ह्यातील बरकोट येथील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक व्यवस्थापनात गुंतलेल्या एका पोलिसाचा डोंगरावरून पडलेल्या दगडाचा धक्का लागून मृत्यू झाला. 

टॅग्स :RainपाऊसHimachal Pradeshहिमाचल प्रदेशUttarakhandउत्तराखंडdelhiदिल्ली