शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारतात पावसाचे थैमान! हिमाचलमध्ये पुरात तिघे गेले वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 07:14 IST

जम्मू-श्रीनगर महामार्गावर दोन ठिकाणी भूस्खलन

शिमला/जम्मू/चंडीगड/लखनौ : उत्तर भारतात मुसळधार पावसाने पुन्हा थैमान घातले आहे. हिमाचल प्रदेशातील शिमलाच्या एका गावात शनिवारी सकाळी लैला नदीला अचानक आलेल्या पुरात ढाबा वाहून गेल्याने एक वृद्ध जोडपे आणि त्यांचा नातू मरण पावल्याची भीती व्यक्त होत आहे, तर जम्मू-श्रीनगर महामार्गावर दोन ठिकाणी भूस्खलन झाले आहे. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, रोहडू भागातील बडियारा गावात ढगफुटी झाली. त्यात वाहून गेलेल्या तिघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. हिमाचल प्रदेशात शुक्रवारपासून मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. राज्यातील ६५६ रस्ते वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. १६७३ ट्रान्स्फाॅर्मर खराब झाले आहेत. शिमलाजवळ काही ठिकाणी रस्त्यांना तडा गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मनालीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली. 

उत्तर प्रदेशात नदीच्या प्रवाहात बस अडकली, ४० प्रवाशांची सुटका 

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमेवर असलेल्या बिजनौर जिल्ह्यातील मंडावली भागात कोटावली नदीच्या प्रवाहात राज्य परिवहन महामंडळाची बस अडकली. यातील ४० प्रवाशांची सुटका करण्यात यश आले आहे. ही बस ४० प्रवाशांसह हरिद्वारला जात होती. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला.

जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस

अतिवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मेहर आणि दलवास भागात भूस्खलन झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ढिगारा हटवल्यानंतर महामार्गावर वाहनांची वाहतूक पूर्ववत करण्यात आली. डोडाजवळ ढगफुटीसदृश पाऊस झाला. तेथे अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यादरम्यान ३४७२ यात्रेकरूंची २०वी तुकडी जम्मूतील भगवती नगर बेस कॅम्प येथून १३२ वाहनांनी शनिवारी पहाटे काश्मीरला रवाना झाली. 

यमुनेची पाणीपातळी धोक्याच्या चिन्हाखाली 

दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी शनिवारी धोक्याच्या चिन्हाच्या खाली गेली आणि गेल्या काही दिवसांपासून ती २०५.३३ मीटरच्या आसपास आहे. हवामान खात्याने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये २५ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. हरयाणातील हथिनीकुंड धरणाची पातळी वाढली गेल्या २४ तासांत पंजाब आणि हरयाणाच्या अनेक भागांत झालेल्या पावसामुळे हथिनीकुंड धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. धरणाच्या पाण्याचा प्रवाह अडिच लाख क्युसेकवर पोहोचला.