शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

मुसळधार पावसानं अनेक राज्यांत पूरस्थिती, 7 राज्यांत 774 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 11:33 IST

देशाला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे.

नवी दिल्ली- देशाला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे अनेक राज्यांतील जनजीवन विस्कळीत झालंय. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानुसार, सात राज्यांत मुसळधार पावसानं आतापर्यंत 774 जणांचा मृत्यू झाला आहे.उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसानं परिस्थिती बिघडलेली आहे. त्याच दरम्यान हवामान खात्यानं उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशसमवेत 16 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय आणीबाणी प्रतिसाद केंद्रा(एनईआरसी)नुसार, पूर आणि मुसळधार पावसानं केरळ राज्यात 187, उत्तर प्रदेश 171, पश्चिम बंगाल 170 आणि महाराष्ट्रात 139 जणांचा मृत्यू झाला आहे.तर गुजरातमध्ये 52, आसाममध्ये 45, नागालँडमध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये 22 आणि पश्चिम बंगालमध्ये पाच लोक बेपत्ता आहेत. सात राज्यांमध्ये मुसळधार पावसानं 245 लोक जखमी झाले आहेत.केरळमध्ये 8 हजार कोटींहून अधिक नुकसानकेरळमध्ये मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे मृतांची संख्या 39च्या वर गेली आहे. इदुक्कीमध्ये 20.86 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच पावसानं राज्यात 8 हजार कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान झालं आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात केरळमध्ये अशा प्रकारे कधीही पूरस्थिती उद्भवलेली नव्हती. मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या मते, आतापर्यंत 8316 कोटींच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे. तर 10 हजारहून अधिक किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत.

टॅग्स :Keralaकेरळfloodपूर