दिल्लीच्या आयजीआय विमानतळाच्या टर्मिनल १ वरील फोरकोर्ट परिसरातील छताचा एक भाग मुसळधार पावसामुळे कोसळला. या घटनेनंतरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
डायल सध्या या विषयावर मौन बाळगत आहेत आणि अधिकृत विधानाची वाट पाहण्यास सांगत आहेत. मुसळधार पावसामुळे दिल्लीविमानतळावरील शेडचे नुकसान झाल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.
शनिवारी रात्री दिल्लीत हवामानात अचानक बदल दिसून आला. राज्यात वादळासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे दिल्लीतील मोती बाग, मिंटो रोड, दिल्ली कॅन्टोन्मेंट आणि दीनदयाळ उपाध्याय मार्ग यासारख्या अनेक भागात पाणी साचले होते. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. सतत पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतूकही विस्कळीत झाली. अनेक उड्डाणे उशिरा झाली आणि अनेक उड्डाणे रद्द करावी लागली, यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.