शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
3
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
4
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
5
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
6
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
7
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
8
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
9
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
10
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
11
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
12
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला
13
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
15
वालाचं बिरडं आणि डाळिंब्यांची उसळ यात आहे छोटासा फरक; श्रावण विशेष पारंपरिक रेसेपी 
16
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
17
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
18
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
19
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
20
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!

हिरे व्यापार्‍यांना गंडा घालणारा महाठग गजाआड

By admin | Updated: October 3, 2014 22:56 IST

हिरे व्यापार्‍यांना गंडा घालणारा महाठग गजाआड

हिरे व्यापार्‍यांना गंडा घालणारा महाठग गजाआड
गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई : हिरे व्यापारी असल्याची बतावणी करून व्यापार्‍यांना कोटींंचा गंडा घालणार्‍या महाठगाला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. धीरूभाई मुंजीभाई पटेल (५२) असे आरोपीचे नाव असून, घाटकोपरमध्ये एका व्यापार्‍याला ९० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. पटेलविरोधात मुंबईसह ठाणे, गुजरात, जयपूर अशा ठिकाणी हिरे व्यापार्‍यांना फसविल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.
पटेल हा मूळचा सुरत येथे राहणारा असून, मुंबईसह ठाण्यातील हिरे व्यापार्‍यांना त्यांनी नाकीनऊ आणले होते. घाटकोपर पूर्वेकडील महात्मा गांधी रोडवर हिरे व्यापारी वसंत दोषी (६२) यांंचे भारती ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान असून, त्यांच्यासोबत मौलिक नावाचा ३३वर्षीय तरुण काम करीत होता. २१ सप्टेंबर रोजी पटेलसहित तिघांनी मौलिकला गाठून आपण हिरे व्यापारी असल्याची बतावणी करून ९० लाखांचे हिरे विकत घ्यायचे असल्याचे सांगितले. २३ सप्टेंबर रोजी हिरे तपासण्याच्या बहाण्याने पटेलसहित तिघा लुटारूंनी हातसफाईने दोषी यांंच्या दुकानातील खर्‍या हिर्‍यांनी भरलेले पाकीट लंपास करून खोट्या हिर्‍यांनी भरलेले पाकीट हातात देऊन पळ काढला. बदललेले पाकीट आणि पाकिटात असलेले हिरे खोटे असल्याचे समजताच या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण कक्ष ७चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सुर्वे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल ढोलेंसह त्यांंच्या तपास पथकांनी दुकानातील सीसीटीव्हीच्या अस्पष्ट छायाचित्रणाच्या आधारे मंुबईतील कानाकोपरा शोधला. मात्र हाती काहीही न लागल्याने गुन्हे शाखेने त्यांचा मोर्चा गुजरात राज्यातील हिरे बाजारात वळविला. सुरत, वडोदरा, अहमदाबाद, अमरेली, भावनगर, राजकोट येथे या त्रिकूटाचा शोध घेत असताना अहमदाबादमध्ये पटेल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अहमदाबाद येथे दबा धरून बसलेल्या पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्‘ाची कबुली दिली. पटेलकडून २० लाख रुपये किमतीचे हिरे गुन्हे शाखेने हस्तगत केले असून, या गुन्‘ात त्याच्यासोबत सहभागी असलेल्या इतर दोघांंचाही गुन्हे शाखा शोध घेत आहे.
.................................
(चौकट)
पटेल उर्फ लंगडा हाच सूत्रधार
पटेल हा लंगडाच्या नावाने गुन्हेगारी जगतात ओळखला जातो. हाच यामागील मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या विरोधात डी.बी. मार्ग पोलीस ठाणे, व्ही.पी. रोड, गावदेवी, बोरीवली, एमआयडीसी, मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात हिरे व्यापार्‍यांना फसविल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्यातही डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात एका हिरे व्यापार्‍याला ३ कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी त्याने शिक्षाही भोगली आहे. तसेच गुजरातमधील सुरत, वडोदरा, जयपूरसह राजस्थानमधील पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात अशाच प्रकारे फसविल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास करीत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
....................................