शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जूनच्या तिसऱ्या आठवड्यात गरमी वाढल्याने विजेची मागणीही वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 03:09 IST

विजेच्या मागणीतील घसरण कमी होऊन ९.७६ टक्क्यांवर आली आहे. आदल्या सप्ताहात ही घसरण १0.५ टक्क्यांवर होती.

नवी दिल्ली : जूनच्या तिस-या आठवड्यात गरमी वाढल्यामुळे देशातील विजेची मागणी काही प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विजेच्या मागणीतील घसरण कमी होऊन ९.७६ टक्क्यांवर आली आहे. आदल्या सप्ताहात ही घसरण १0.५ टक्क्यांवर होती. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. त्याचा परिणाम म्हणून विजेची मागणी घटली होती. लॉकडाऊन उठविण्यास सुरुवात झाल्यामुळे आता विजेची मागणी हळूहळू वाढताना दिसून येत आहे. वास्तविक अजून औद्योगिक क्षेत्रातील घडामोडी अजून पूर्णांशाने सुरू झालेल्या नाहीत.जूनच्या पहिल्या सप्ताहात विजेची मागणी १९.७ टक्क्यांनी घटली होती. त्यानंतर मागणी वाढल्याने घसरण कमी झाल्याचे दिसून येत आहे. तथापि, अजूनही वीज मागणीतील घसरण मे महिन्यातील ८.८ टक्क्यांच्या घसरणीच्या तुलनेत अधिक आहे.वीज मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जूनच्या तिसºया सप्ताहात भीषण उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. १५ जूनपासून देशातील वीज मागणी सुमारे १६२ गिगावॅटच्या आसपास आहे. शुक्रवारी १९ जून रोजी ती १६४.६४ गिगावॅटपर्यंत वाढली होती.व्यस्त काळात विजेची शीर्ष मागणी ११ जून रोजी १६३.३0 गिगावॅट होती. १२ जून रोजी ती १५८.0२ गिगावॅट, १३ जून रोजी १५७.७९ गिगावॅट आणि १४ जून रोजी १५६.८८ गिगावॅट होती.या सप्ताहात शीर्ष मागणी १६४.६४ गिगावॅट राहिली. मागील वर्षीच्या जूनमध्ये याच सप्ताहात ती १८२.४५ गिगावॅट होती. याचाच अर्थ यंदा शीर्ष मागणीत ९.७६ टक्के घसरण झाली आहे. मागणी १५ जून रोजी १६२.३५ गिगावॅट असलेली विजेची शीर्ष मागणी १९ जून रोजी १६४.६४ गिगावॅटवर गेली. ४ जूनला ही मागणी १३८.२८ गिगावॅट आणि ६ जूनला १४६.५३ गिगावॅट होती. अशा प्रकारे या काळात विजेची शीर्ष मागणी १४६.५३ गिगावॅट राहिली. मागील वर्षी जूनच्या याच काळात ती १८२.४५ गिगावॅट होती. याचाच अर्थ या काळात विजेची शीर्ष मागणी १९.७ टक्क्यांनी घटली आहे.या महिन्याच्या दुसºया सप्ताहात व्यस्त काळात विजेची मागणी पहिल्या सप्ताहातील मागणीच्या तुलनेत १८.७ टक्क्यांवरून घटून १0.५ टक्क्यांवर आली. त्याचप्रमाणे जूनच्या तिसºया सप्ताहात ती आणखी थोडी कमी होऊन ९.७६ टक्क्यांवर आली.>लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून वाढएका उद्योग विशेषज्ञाने सांगितले की, व्यावसायिक आणि औद्योगिक घडामोडी जशा वाढतील, तशी विजेची मागणी वाढून सामान्य पातळीच्या दिशेने जात राहील.कोविड-१९ विषाणूच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी सरकारने २५ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन लागू केले होते. त्यानंतर २0 एप्रिलपासून त्याला शिथिलता आणण्यास सुरुवात केली होती.