नवी दिल्ली : वाहतूक पोलिस आणि इस्पितळाच्या चोख समन्वयामुळे एका हृदयाने १६ मिनिटात पार केलेल्या २० किलोमीटरच्या प्रवासामुळे एका गरजूला जीवदान मिळाले. करोल बाग ते साकेत दरम्यानचे अंतर २० किलोमीटर आहे. एका ५७ वर्षीय मृत इसमाचे हृदय आणि इतर अवयवांचे प्रत्योरोप केल्यास इतर गरजू रूग्णांना नवजीवन मिळू शकते, यासाठी हा मार्ग हृदय आणि इतर अवयव इस्पितळात वेळेत पोहोचविण्यासाठी हा मार्ग मोकळा करून देण्यात यावा, अशी विनंती दिल्ली पोलिसांना शुक्रवारी मध्यरात्रीच करण्यात आली होती. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी करोलबाग स्थित बी. एल. कपूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते साकेतस्थित मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत मार्ग फक्त यासाठीच उपलब्ध करू दिला. २० मिनिटांचे अंतर अवघ्या १६ मिनिटांत पार करून वेळेत ही महत्त्वाची अवयवे मॅक्स हॉस्पिटलात पोहोचती करण्यात आली. मॅक्स हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तातडीने एका रूग्णावर हृदयाचे यशस्वी प्रत्योरोपण केले. तसेच इतर अवयवही सहा गरजू रुग्णांवर प्रत्यारोपित केल्याने त्यांना नवजीवन मिळाले. मॅक्स हॉस्पिटलमध्ये पार पडलेली हृदय प्रत्यारोपणाची ही पहिलीच शस्त्रक्रिया होय.
हृदय १६ मिनिटात इस्पितळात...
By admin | Updated: August 2, 2015 02:04 IST