‘न्यूजक्लिक’ संस्थापकांच्या याचिकांवरील सुनावणी पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 12:10 PM2023-11-07T12:10:28+5:302023-11-07T12:10:35+5:30

न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने दोन्ही आरोपींची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांना सांगितले की, या याचिकांवर सुटीनंतर सुनावणी होईल.

Hearing on petitions of 'Newsclick' founders continues | ‘न्यूजक्लिक’ संस्थापकांच्या याचिकांवरील सुनावणी पुढे

‘न्यूजक्लिक’ संस्थापकांच्या याचिकांवरील सुनावणी पुढे

नवी दिल्ली : न्यूज पोर्टल ‘न्यूजक्लिक’चे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ व मनुष्यबळ विभाग प्रमुख अमित चक्रवर्ती यांच्या अटकेविरोधात दाखल याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आज पुढे ढकलली.   
न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने दोन्ही आरोपींची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांना सांगितले की, या याचिकांवर सुटीनंतर सुनावणी होईल.
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या त्या निकालाच्या कक्षेत येते, ज्यात हे स्पष्टपणे  सांगितले होते की, अटक करण्याचे कारण आरोपींना तत्काळ सांगितले पाहिजे. परंतु, या प्रकरणात तसे केले गेले नाही, असे सिब्बल म्हणाले. आरोपींचा वैद्यकीय जामिनासाठीचा अर्जही न्यायालयात प्रलंबित  आहे, असेही ते म्हणाले. १९ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या पुरकायस्थ व चक्रवर्ती यांच्या याचिकांवर दिल्ली पोलिसांना उत्तर देण्यास सांगितले होते.

Web Title: Hearing on petitions of 'Newsclick' founders continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.