शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या वादामुळे लटकली मराठा आरक्षणाची सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 06:15 IST

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अन्य कामात व्यस्त

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचा दर्जा देऊन त्यांना सरकारी नोकऱ्या व शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा राज्य सरकारने केलेला कायदा वैध ठरविणाºया उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केल्या गेलेल्या अपिलांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अयोध्या वादामुळे लटकली आहे. या अपिलांची सुनावणी करणाºया खंडपीठावरील सरन्यायाधीशांसह तिन्ही न्यायाधीश अयोध्या प्रकरणाच्या दैनंदिन सुनावणीत व्यस्त आहे. अयोध्येची ही सुनावणी केव्हा संपेल याची खात्री नसल्याने मराठा आरक्षणाचा विषयही तोपर्यंत लटकत राहणार आहे.

एकूण सहा अपिले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ती १२ जुलै रोजी सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे सर्वप्रथम आली तेव्हा प्रतिवादींना नोटिसा काढल्या गेल्या. खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निकालास अंतरिम स्थगिती दिली नाही मात्र तशी स्थगिती द्यायची की नाही यावर दोन आठवड्यांनी विचार करण्याचे ठरविले होते.

त्यानुसार अंतरिम स्थगितीवर विचार करण्यासाठी ही अपिले जुलैच्या तिसºया आठवड्यात न्यायालयापुढे यायला हवी होती. परंतु त्यानंतर एक महिना उलटला तरी सुनावणीला मुहूर्त लागलेला नाही. २० जुलै रोजी ही अपिले रजिस्ट्रार सुरिंदर राठी यांच्यापुढे आली तेव्हा त्यांनी प्रतिवादींना चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्रे करण्यास सांगून थेट २९ नोव्हेंबरची पुढील तारीख दिली होती.

अयोध्येची सुनावणी सुरु झाल्यानंतर एका अपिलकर्त्याच्या वकिलाने अन्य एका खंडपीठापुढे जाऊन ही परिस्थिती लक्षात आणून दिली तेव्हा सुयोग्य खंडपीठापुढे ही प्रकरणे लावली जावीत, असे निर्देश झाले. तेव्हापासून ही अपिले सरन्यायाधीश न्या. गोगोई, न्या. अशोक भूषण व न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाच्या बोर्डावर दाखविली जात आहेत. परंतु हे तिन्ही न्यायाधीश अयोध्या सुनावणी करणाºया घटनापीठावरही असल्याने या खंडपीठाचे काम स्वतंत्रपणे होत नाही.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय