शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Case: हिंदू पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण, लवकर निर्णय येण्याची शक्यता वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 11:40 IST

Ram Mandir Case: देशात राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठरलेल्या अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यामध्ये हिंदू पक्षकारांची सुनावणी पूर्ण झाली आहे.

नवी दिल्ली  - देशात राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठरलेल्या अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यामध्ये हिंदू पक्षकारांची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचा नोव्हेंबर महिन्यामध्ये निकाल येण्याची शक्यता वाढली आहे.  अयोध्येतील या 2.77 एकर जागेच्या मालकी हक्कावरून गेल्या 70 वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे. आता सोमवारपासून मुस्लिम पक्षकार आपली बाजू मांडणार आहेत. अयोध्येतील वादग्रस्त जमिनी प्रकरणी 6 ऑगस्टपासून नियमित सुनावणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर 25 दिवसांमध्ये हिंदू पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा लवकरच अंतिम निकाल लागण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने या खटल्यावर निकाल देताना एकूण वादग्रस्त जमिनीपैकी दोन तृतियांश जमीन हिंदू पक्षकारांना दिली होती. दरम्यान, नियमित सुनावणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, डी.वाय. चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने अत्यंत कमी वेळात रामलल्ला, निर्मोही आखाडा, अखिल भारतीय रामजन्मभूमी पुनर्निर्माण समिती, हिंदू महासभेचे दोन गट शिया वक्फ बोर्ड आणि गोपाल सिंह विशारद यांचे कायदेशीर उत्तराधिकारी यांचा युक्तिवाद ऐकून घेतला. यादरम्यान वकिलांनी आपापला वेगवेगळा तर्क मांडावा आणि इतरांच्या वक्तव्यांची पुनरावृत्ती करू नये, असे सांगितले.  या आठवड्यातही या खटल्याची सलग पाच दिवस सुनावणी झाली. ज्यामध्ये कामकाज झटपट आटोपले. मात्र सुन्नी वक्फ बोर्डाची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील राजीव धवन यांनी युक्तिवादास पुरेसा वेळ मिळणार नाही असे सांगत नियमित सुनावणीस विरोध केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचे म्हणणे फेटाळून लावले होते.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय