शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

बागेश्वरबाबाचे प्रवचन ऐकले अन् रुखसानाची बनली रुक्मिणी; त्यानंतर प्रियकरासोबत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 13:18 IST

कॉलेजमध्ये असताना रोशनची ओळख मुजफ्फरपूरच्या गिजांस इथं राहणाऱ्या रुखसाना अन्सारीसोबत झाली. हे दोघेही बिहारचे होते

नवी दिल्ली - पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचे प्रवचन ऐकून मुजफ्फरपूरची नौशिन परवीन उर्फ रुखसानाची आता रुक्मिणी बनली आहे. हिंदू प्रथा परंपरेने तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केले. तिचा बॉयफ्रेंड रोशन कुंवर हा बिहारच्या वैशाली इथं राहणारा आहे. ४ वर्षापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू आहेत. बागेश्वर बाबाचे प्रवचन ऐकून मुलीने हिंदू धर्म स्वीकारण्याचं ठरवले. 

धर्म परिवर्तन केलेली रुक्मिणी म्हणाली की, मी बागेश्वार बाबांच्या दरबारात यायचे. त्याठिकाणी त्यांचे प्रवचन ऐकत होती. त्यावेळी मी इस्लाम धर्मात होते. सनातन धर्म स्वीकारून मी लग्न करेन असं मी ठरवले. त्यानंतर वैशाली येथील गंडक नदीत डुबकी मारून तिचे प्रथेनुसार हिंदू धर्म स्वीकारला त्यानंतर बॉयफ्रेंड रोशनसोबत जात मंदिरात लग्न केले. 

जयपूरमध्ये झाली प्रेमाला सुरुवात  रोशन आणि रुक्मिणी या दोघांमधील प्रेम जयपूरच्या कॉलेजपासून सुरू झाले. कॉलेजमध्ये असताना रोशनची ओळख मुजफ्फरपूरच्या गिजांस इथं राहणाऱ्या रुखसाना अन्सारीसोबत झाली. हे दोघेही बिहारचे होते. पाहता पाहता दोघेही एकमेकांच्या जवळ आले. ४ वर्ष या दोघांचे प्रेम प्रकरण सुरू आहे. दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते परंतु घरचे तयार नव्हते. एकेदिवशी दोघेही बागेश्वर धामच्या बाबाच्या दरबारात गेले. रुखसाना पंडीत धीरेंद्र शास्त्रींचे प्रवचन ऐकून प्रभावित झाली. त्यानंतर तिने सनातन धर्म स्वीकारण्याचे ठरवले. 

त्यानंतर सर्वात आधी रुखसानाने हिंदू प्रथा परंपरेनुसार धर्म परिवर्तन करत स्वत:चे नाव रुक्मिणी ठेवले. गंडक नदीत विधी पार पडले. मग रोशन आणि रुक्मिणीने मंदिरात जात लग्न केले. या दोघांचे लग्न लावणाऱ्या पंडित कमलाकांत पांडे यांनी सांगितले की, हिंदू प्रथेनुसार या दोघांचे लग्न झाले आहे. मुलगा आणि मुलीने एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचे वचन दिले आहे. यावेळी अनेकांनी या दोघांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामHinduहिंदू