शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या नवीन 'XE व्हेरिएंट'बाबत आरोग्यमंत्र्यांची तज्ज्ञांसोबत बैठक, 'या' विशेष सूचना दिल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 15:38 IST

corona :या बैठकीनंतर मनसुख मांडविया यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज कोरोनाच्या नवीन 'XE व्हेरिएंट ' संदर्भात बैठक घेतली. या बैठकीनंतर मनसुख मांडविया यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आज कोरोनाच्या नवीन 'XE व्हेरिएंट' संदर्भात देशातील वरिष्ठ तज्ज्ञांसोबत बैठक झाली. तसेच, कोरोनाच्या प्रकरणांचाही आढावा घेतला आणि कोरोनाचे नवीन  व्हेरिएंट्स आणि प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी सुरू असलेली देखरेख आणि पाळत ठेवणारी यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या सूचना दिल्या.

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरातील लोकांची चिंता वाढली आहे. त्यामुळेच भारत सरकारही या नवीन व्हेरिएंटबाबत सतर्क दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत भारतातही कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची काही प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर सर्व खबरदारीच्या उपायांवर चर्चेची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईनंतर भारतात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट XE चा आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये आढळून आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.

कोरोना व्हायरसचा हा व्हेरिएंट खूपच संसर्गजन्य असल्याचे म्हटले जाते. तसेच, ओमायक्रॉनच्या BA.2 सब-व्हेरिएंटपेक्षा  XE व्हेरिएंट 10 टक्के अधिक संसर्गजन्य असल्याचे दिसून येते, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. सध्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा भाग म्हणून XE म्यूटेशनला ट्रॅक केले जात आहे. ओमायक्रॉनच्या लक्षणांमध्ये ताप, घसा खवखवणे, खोकला आणि सर्दी, त्वचेची जळजळ यांचा समावेश आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यOmicron Variantओमायक्रॉन