शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
4
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
5
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
6
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
7
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
8
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
9
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
10
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
11
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
12
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
13
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
14
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
15
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
16
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
17
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
18
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
19
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘हा २००८ चा बदला’ असे तो म्हणत होता, एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणात साक्षीदाराने नोंदवला जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 08:19 IST

Express firing case: जुलै २०२३ मध्ये झालेल्या एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणातील एका साक्षीदाराने सोमवारी सत्र न्यायालयाला साक्ष दिली की, त्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक दाढीवाला माणूस आणि जवळच रायफल घेऊन उभा असलेला आरोपी जवान पाहिला.  ‘हा २००८ चा बदला आहे...’असे तो जवान म्हणत होता.

मुंबई - जुलै २०२३ मध्ये झालेल्या एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणातील एका साक्षीदाराने सोमवारी सत्र न्यायालयाला साक्ष दिली की, त्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक दाढीवाला माणूस आणि जवळच रायफल घेऊन उभा असलेला आरोपी जवान पाहिला.  ‘हा २००८ चा बदला आहे...’असे तो जवान म्हणत होता. माजी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरीवर त्याचे वरिष्ठ सहकारी  असिस्टंट सब-इन्स्पेक्टर टीका राम मीना, तसेच तीन प्रवाशांचा खून केल्याचा आरोप आहे. ही घटना ३१ जुलै २०२३ रोजी जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये पालघर रेल्वेस्थानकाजवळ घडली होती. चौधरीला घटनेनंतर रेल्वे रुळांवरून पळताना पकडण्यात आले.

घटनेवेळी एस-६ कोचमध्ये प्रवाससाक्षीदार जीएसटी विभागात कार्यरत आहे, तो त्या वेळी रेल्वेच्या एस-६ कोचमध्ये प्रवास करत होता. साक्षीदाराने अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. बी. पठाण (दिंडोशी न्यायालय) यांच्यासमोर साक्ष दिली.  ‘त्या’ भयंकर दृश्यामुळे मी घाबरलो आणि डब्याच्या दुसऱ्या टोकाकडे चालू लागलो, तेव्हाच मी त्या आरपीएफ कर्मचाऱ्याला ‘हा  २००८ चा बदला आहे’ असे म्हणताना ऐकले, असे साक्षीदाराने सांगितले. 

जवानाला रुळांवर उतरताना पाहिलेअतिरिक्त सरकारी वकील सुधीर सापकळे यांनी म्हटले की, साक्षीदाराने आरपीएफ कॉन्स्टेबलला  रेल्वे रुळांवर उतरताना पाहिले, तर बचाव पक्षाने ही साक्ष खोटी असल्याचे न्यायालयाला सांगितले. चौधरीने रेल्वेच्या चालत्या डब्यात प्रवाशांना ठार मारताना अनेक धार्मिक द्वेषयुक्त विधाने केली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : 2008 revenge, he said: Witness recounts express train shooting.

Web Summary : Witness testified seeing a bleeding man and a rifle-wielding officer. The officer claimed 'revenge for 2008.' RPF constable Chetan Singh is accused of killing his superior and three passengers on the Jaipur-Mumbai Express. He was apprehended fleeing the scene.
टॅग्स :Mumbaiमुंबई