दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाबाबत तपास पथकांचा संशय पुलवामा येथील रहिवासी डॉ. उमर नबीवर अधिकच बळावला आहे. बॉम्बस्फोटासाठी वापरलेली कार उमर हाच चालवत होता. पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथून त्याच्या दोन भावांना आणि आईला ताब्यात घेतले आहे. यावर आता त्याच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली. ते उमर हा एक शांत तरुण असल्याचा दावा करत आहेत. तो अशा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होऊ शकत नाही, असा कुटुंबीयांचा विश्वास आहे. डॉ. उमर नबी हा पुलवामा येथील कोइल गावचा रहिवासी आहे.
बॉम्बस्फोटातील संशयित डॉ. उमर उन नबी याची भाभी मुझम्मिल यांनी एएनआय या वृत्त संस्थेला प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, "सुरक्षा दलांनी माझे पती, माझे मेहुणे आणि माझ्या सासूला ताब्यात घेतले. त्यांनी आम्हाला विचारले की उमर कुठे आहे आणि आम्ही त्यांना सांगितले की तो दिल्लीत आहे. त्यानंतर त्यांनी त्या तिघांनाही त्यांच्यासोबत नेले, सुरक्षा दल काहीतरी चौकशी करणार आहेत, असंही त्यांनी सांगितले.
"तो शांत होता आणि जास्त बोलत नव्हता"
आरोपावर बोलताना मुझम्मिल म्हणाल्या की, "त्याच्याबद्दल जे काही बोलले जात आहे त्यावर माझा विश्वास बसत नाही. तो एक शांत माणूस होता, शांत स्वभावाचा होता, जास्त बोलत नव्हता, कोणाशीही संबंध ठेवत नव्हता, त्याचे जास्त मित्र नव्हते आणि तो फक्त अभ्यास करत होता. मला एवढेच माहित आहे आणि मी एवढेच म्हणू शकते."
तो जेव्हा जेव्हा घरी यायचा तेव्हा तो फक्त क्रिकेट खेळायचा
"आम्ही गेल्या शुक्रवारी उमरशी शेवटचे बोललो होतो आणि तेव्हापासून आम्हाला त्याच्याकडून काहीही कळले नाही. तो माझ्या मुलांशी खूप प्रेम करत होता आणि त्यांच्यावर खूप प्रेम करत होता. त्याला त्यांच्याबद्दल खूप प्रेम, नाते आणि आपुलकी होती. त्याला क्रिकेटचीही खूप आवड होती. तो जेव्हा जेव्हा घरी यायचा तेव्हा तो फक्त क्रिकेट खेळायचा. त्याला क्रिकेटचे खेळण्याचे व्यसन होते", असंही मुझम्मिल म्हणाल्या.
"मी आदिलला ओळखत नाही. मी फक्त त्याचे नाव तुमच्याकडून ऐकले आहे. मी फक्त एवढेच सांगू शकते उमर तसा माणूस नव्हता. तो असेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. आम्ही त्याला शिक्षण देण्यासाठी, इथे आणण्यासाठी खूप संघर्ष केला, आम्ही कठोर परिश्रम केले आणि पूर्ण समर्पणाने, आम्ही त्याला इथे आणले जेणेकरून तो काहीतरी कमवू शकेल आणि त्याच्या कुटुंबाला मदत करू शकेल, असेही त्यांनी सांगितले.
Web Summary : Family of Dr. Umar Nabi, suspected in the Delhi blast, claims he is quiet and incapable of terrorism. Police questioned relatives in Pulwama, but they maintain his innocence, describing him as a cricket-loving, studious person with few friends.
Web Summary : दिल्ली विस्फोट के संदिग्ध डॉ. उमर नबी के परिवार का दावा है कि वह शांत स्वभाव का है और आतंकवाद में शामिल नहीं हो सकता। पुलवामा में पुलिस ने रिश्तेदारों से पूछताछ की, लेकिन उन्होंने उसकी बेगुनाही का दावा किया, उसे क्रिकेट प्रेमी, अध्ययनशील और कम दोस्तों वाला बताया।