शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना लडाखमध्ये चोख उत्तर दिले; पंतप्रधानांचा चीनला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 03:08 IST

‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मातृभूमीच्या रक्षणासाठी लडाखमध्ये शहीद झालेल्या वीर जवानांच्या शौर्याला संपूर्ण देश नमन करत आहे,

नवी दिल्ली: भारत जशी मित्रता जपणे जाणतो तसेच डोळ््याला डोळे भिडवून जशास तसे उत्तरही देऊ शकतो. लडाखमध्ये भारतीय भूमीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना कणखरपणे प्रत्युत्तर दिले गेले आहे. भारतमातेच्या प्रतिष्ठेस कधीही कमीपणा येऊ दिला जाणार नाही, हे आपल्या शूर सैनिकांनी जगाला दाखवून दिले आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर कुरापती करणाºया चीनला रविवारी थेट टोला लगावला.

‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मातृभूमीच्या रक्षणासाठी लडाखमध्ये शहीद झालेल्या वीर जवानांच्या शौर्याला संपूर्ण देश नमन करत आहे, त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. संपूर्ण देश या वीर जवानांचा कृतज्ञ आहे, त्यांच्यापुढे नतमस्तक आहे. या जवानांच्या हौतात्म्याने त्यांच्या कुटुंबियांप्राणेच प्रत्येक भारतीय हळहळला आहे. भारतमातेच्या या वीर सुपुत्रांच्या बलिदानाविषयी त्यांच्या कुटुंबियांना जो गर्व आहे, देशाप्रती जी निष्ठा आहे तीच देशाची खरी ताकद आहे.

पंतप्रधान म्हणाले की, या शहीद जवानांचे माता-पिता त्यांच्या दुसऱ्या मुलांनाही सैन्यात पाठवायला तयार आहेत. काहींनी तर नातवंडांनाही देशाच्या रक्षणासाठी धाडण्याचे बोलून दाखविले आहे. या शहीद कुटुंबांचा त्याग पूजनीय आहे. भारतमातेच्या रक्षणाच्या ज्या दृझनिश्चयाने या जवानांनी बलिदान दिले आहे, तोच संकल्प प्रत्येक नागरिकाने त्याच्या जीवनाचे ध्येय बनविण्याची गरजआहे. हीच खरी शहिदांना श्रद्धांजली ठरेल.

स्वाभिमान आणि सार्वभौमत्वाचे रक्षण हा भारताचा संकल्प आहे. स्वावलंबन हे भारताचे लक्ष्य आहे, विश्वास आणि मैत्री ही भारताची परंपरा आहे व बंधुभाव हाच भारताचा स्थायीभाव आहे. हेच आदर्श समोर ठेवून भारत भविष्यातही वाटचाल करत राहील, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

इको फ्रेन्डली गणपतीपाऊस धरतीला पुनरुज्जीवन देतो. पण त्यासाठी आपणही पर्यावरण जपायला हवे, यावर भर देत पंतप्रधानांनी आगामी गणेशोत्सवात जलस्त्रोतांचे प्रदूषण होणार नाही, अशा फक्त ‘इको फ्रेन्डली’ गणेशमूर्तींचे पूजन करण्याचे आवाहन केले. तसेच एरवीही पावसाळ््यात अनेक प्रकारच्या साथा पसरत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची अधिक काळजी घेण्याचाही त्यांनी आग्रह धरला.वर्षाचे सुरुवातीचे सहा महिने वाईट गेले म्हणून यंदाचे संपूर्ण वर्षच देशासाठी वाईट आहे, असे मानण्याचे कारण नाही. उलट सन २०२० हे वर्ष या दशकात देशाला नवी दिशा देणारे ठरेल. भारताचा इतिहासच अनेक संकटांवर मात करून अधिक बलशाली होऊन त्यातून बाहेर पडण्याचा आहे. शेकडो वर्षे संकटे आली तेव्हा भारत यातून सावरणार नाही, ही संस्कृती नष्ट होईल, असे अनेकांना वाटले. पण अशा प्रत्येक वेळी भारत अधिक भव्य स्वरूपात बाहेर पडला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन