अहमदाबाद : गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील धनपुराजवळ ६ दिवसांपूर्वी जळालेल्या कारचे गूढ समोर आले आहे. १.२६ कोटी रुपयांची विम्याची रक्कम मिळवण्यासाठी गावातील एका व्यक्तीने स्वत:च्या मृत्यूचे नाटक रचल्याचे तपासात समोर आले आहे. यासाठी आरोपीने स्मशानभूमीतून एक मृतदेह बाहेर काढून तो गाडीतच जाळला. इतकेच नाही तर तो १.२६ कोटी रुपयांचा विमा मंजूर करून फरारही झाला.
आरोपी दलपतसिंग परमार सध्या फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृत्यूचे नाटक का? - दलपतसिंगचा सहकारी नरसिंगने चौकशीत सांगितले की, दलपतने गावाजवळ हॉटेल उघडले होते. त्यामुळे त्याच्यावर १५ लाखांचे कर्ज झाले होते. त्याच वेळी, कारवर सुमारे २ लाख रुपयांचे कर्ज होते.- या कटामुळे त्याचे कर्जही फिटले असते व १ कोटी रुपयांचा अपघात विमा आणि २६ लाखांची एलआयसी विमा रक्कमही मिळाली असती.