शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यनिष्ठेला सलाम..."मला १५०० जवानांची काळजी घ्यायचीय, कुटुंब तू सांभाळ!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 11:06 IST

काश्मीरच्या हंदवाड्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना कर्नल आशुतोष शर्मा यांना वीरमरण

श्रीनगर: आमचं कुटुंब आशुतोष यांना कायम त्यांच्या धैर्यासाठी लक्षात ठेवेल, अशी भावना काश्मीरच्या हंदवाडामधील चकमकीत शहीद झालेले कर्नल आशुतोष शर्मांच्या पत्नीनं व्यक्त केली. आशुतोष यांचं त्यांच्या गणवेशावर प्रेम होतं. त्यांनी कायमच त्यांच्या युनिटला प्राधान्य दिलं. त्यांच्या जाण्यानं माझं खूप मोठं नुकसान झालं. ते कधीही भरुन येणार नाही. स्वत:च्या सहकाऱ्यांच्या, देशाच्या नागरिकांच्या संरक्षणसाठी माझ्या पतीनं केलेल्या कार्याचा मला सार्थ अभिमान आहे, असं शर्मा यांच्या पत्नी पल्लवी आशुतोष म्हणाल्या. काल हंदवाड्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना शर्मा यांच्यासह एक मेजर आणि दोन जवान शहीद झाले.आशुतोष यांनी कायम त्यांच्या युनिटला प्राधान्य दिलं. त्यांच्या युनिटमधील सहकाऱ्यांची तंदुरुस्ती, त्यांना मिळणारं जेवण याबद्दल ते कायम सजग होते. एक अधिकारी म्हणून त्यांनी कायम त्यांच्या सहकाऱ्यांची काळजी घेतली, अशा शब्दांत पल्लवी यांनी पतीच्या आठवणींना उजाळा दिला. मी दहशतवाद्यांना कंठस्नान घालेन आणि घरी परत येईन, असं ते कायम म्हणायचे. होय, ते परत येत आहेत. पण तिरंग्यात लपेटून येत आहेत, अशा हृदयद्रावक भावना त्यांनी व्यक्त केली.काही महिन्यांपूर्वीच एका वृत्तवाहिनीनं करवाचौथच्या दिवशी आपली मुलाखत घेतल्याचं पल्लवी यांनी सांगितलं. 'त्यावेळी कर्नल आशुतोष शर्मा कर्तव्य बजावत होते. मी त्यांच्यासाठी करवाचौथचा उपवास केला होता. त्यावेळी वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे घरी आले होते. आज पुन्हा वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे आमच्या घरी आले आहेत. मात्र तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत मोठा फरक आहे,' असं पल्लवी म्हणाल्या. मी घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळेन, असा त्यांना ठाम विश्वास होता. त्यांच्या अनुपस्थितीत मी कुटुंबाची काळजी घेईन, याबद्दल ते कायम निश्चिंत असायचे. मला दीड हजार सहकाऱ्यांची काळजी घ्यायची आहे. तू कुटुंबाची नीट काळजी घेशील याची मला खात्री आहे, असं त्यांनी मला अनेकदा म्हटलं होतं, असं पल्लवी यांनी सांगितलं. २७ फेब्रुवारीला काश्मीरच्या उधमपूरमध्ये सेना पदक वितरण सोहळ्यात पल्लवी आणि आशुतोष यांची अखेरची भेट झाली. मात्र ही भेट केवळ दोन दिवसांची होती.  

टॅग्स :Martyrशहीद