शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

'तो'ही झाला 'रोशन'; प्रिया प्रकाशच्या व्हिडीओतील उगवता तारा कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 18:26 IST

सोशल मीडियावर एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरनं अनेकांना स्वतःच्या अदांनी अक्षरशः घायाळ केलं. परंतु प्रिया प्रकाश वारियर ज्याच्यावर फिदा आहे तो रोशन अब्दुल रहुफ काहीसा दुर्लक्षित राहिलाय.

नवी दिल्ली- सोशल मीडियावर एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरनं अनेकांना स्वतःच्या अदांनी अक्षरशः घायाळ केलं. परंतु प्रिया प्रकाश वारियर ज्याच्यावर फिदा आहे तो रोशन अब्दुल रहुफ काहीसा दुर्लक्षित राहिलाय. प्रियाबरोबर व्हिडीओतून दिसणारा अभिनेता रोशनही आता चर्चेत येऊ लागला आहे. रोशन हा फक्त 18 वर्षांचा असून, व्हिडीओमध्ये तो प्रियाशी फ्लर्ट करताना दाखवण्यात आला आहे. आतापर्यंत तुम्हाला प्रियाबद्दल सर्वकाही समजलं आहे, आता रोशनबद्दल जाणून घेऊ या. रोशन सध्या कॉलेजियन शिक्षण पूर्ण करतो आहे.तो त्रिशूरमध्ये आयसीएच्या पहिल्या वर्षाला आहे. रोशन हा अभिनयासोबत उत्तम नृत्यही करतो. त्यानं एका डान्स रिअॅलिटी शोतल्या 'डी 4' मध्येही सहभाग घेतला आहे. रोशनसाठी हा पहिलाच सिनेमा आहे. चित्रपटातील गाण्यातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला रोशनही मीडियासमोर व्यक्त झाला आहे. तो म्हणाला, हा माझा पहिलाच चित्रपट आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की, या चित्रपटात पाच अभिनेते आणि पाच अभिनेत्री असतील. मी आणि प्रिया त्यातीलच एक जोडी आहोत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही माझ्या कुटुंबीयांना उत्कंठा लागून राहिली आहे. रोशननं याआधी कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही. या चित्रपटामुळे रोशनला चांगल्या ऑफर मिळतील, अशी आशा त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, प्रिया प्रकाश वारियर एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. नजरेनं घायाळ करणारे बाण सोडणारी  व्हिडीओतील ही तरुणी मल्याळम सिनेमातील अभिनेत्री आहे. व्हॅलेंटाइन वीकदरम्यान व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडीओमुळे सध्या देशभरात तिचीच चर्चा सुरू आहे. प्रियाचा आगामी सिनेमा 'ओरू अदार लव्ह’ मधील ‘Manikya Malaraya Poovi’ या गाण्याचा हा व्हिडीओ आहे. हे गाणं शान रहमान यांनी संगीतबद्ध केले आहे. 26 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये डोळ्यांच्या हावभावांतून आपलं प्रेम व्यक्त करताना ती दिसतेय.काय आहे व्हिडीओमध्ये ?व्हिडीओमध्ये शाळकरी मुलांमधील प्रेमाचे दृश्य दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रिया डोळ्यांच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. तिच्या या अदा अगदी कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. सोशल मीडियावर प्रियाच्या सौंदर्याची प्रचंड स्तुती केली जात आहे. प्रिया ही केरळमधील त्रिशूर येथील राहणारी आहे. तिला डान्स आणि फिरण्याची आवड आहे. दरम्यान प्रियाचा हा पहिलाच सिनेमा असून येत्या 3 मार्चला सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. मात्र सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रिया या व्हायरल व्हिडीओमुळे भलतीच प्रसिद्ध झाली आहे.  

टॅग्स :Priya Varrierप्रिया वारियर