शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अडीच लाख रुपये किलाेचा आंबा खाल्लाय का कधी? जबलपूरमधील संकल्प परिहारच्या आमरायांतील शाही थाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 08:00 IST

जबलपूरमधील आंब्याने मोठा विक्रमच केला आहे. तेथील संकल्प परिहारच्या आमराईतील मियां जातीचा आंबा आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिकिलोला चक्क अडीच लाख रुपयांना विकला जात आहे. 

- संजय परोहालोकमत न्यूज नेटवर्कजबलपूर : फळांचा राजा असलेल्या आंब्याची प्रतिडझन किंवा प्रतिकिलो सर्वांत जास्त किंमत किती असेल? असा प्रश्न विचारला तर बुद्धीला कितीही ताण दिला तरीही तो आकडा हजारांमध्येच असेल, असे उत्तर हमखास मिळेल; पण  जबलपूरमधील आंब्याने मोठा विक्रमच केला आहे. तेथील संकल्प परिहारच्या आमराईतील मियां जातीचा आंबा आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिकिलोला चक्क अडीच लाख रुपयांना विकला जात आहे. 

या आंब्याच्या सुरक्षेसाठी तितकाच मोठा जामानिमा आहे. आमराईला मोठे कुंपण आहेच; त्याशिवाय ११ श्वान तिथे कायम पहारा देत असतात. या परिसरात ५०० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच लाख रुपये प्रतिकिलो या दराने विकल्या जाणाऱ्या या मियां जातीच्या आंब्याची भारतीय बाजारपेठेत मात्र ५००० ते २१००० रुपये प्रतिकिलो किंमत आहे. जबलपूरला नर्मदा नदीच्या किनारी असलेल्या या आमराईत तो उपलब्ध आहे. आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर संकल्प परिहारने भर दिला आहे. 

आमराईत जपानच्या ‘टाईयो नो टमैगो’ या दुर्मीळ व अतिशय महागड्या आंब्यांचीही झाडे आहेत. जपानच्या बाजारपेठेत या आंब्याची किंमत प्रतिकिलो २.५० लाख रुपये आहे. जबलपूर चरगवां रोडवर तिलवारापासून ७ कि.मी. अंतरावर संकल्प सिंह यांच्या मालकीची साडेचार एकरांची आमराई आहे. 

आमरायांमध्ये तब्बल२४ जातींचे आंबे संकल्प परिहारच्या आमरायांमध्ये २४ जातींचे आंबे आहेत. त्यामध्ये आम्रपाली, मल्लिका, हापूश, केसर, बादाम, दशहरी, लंगडा, चौसा, सफेदा, बॉम्बेग्रीन, टाईयो नो, टमैगो, मियाजाकी, ब्लॅक मँगो, जम्बो ग्रीन, जॅपनीज, ड्रॅगन, यूएसए सक्सेसन, गुलाब केशर, हुस्नेआरा, हल्दीघाटी, गुलाब खास, गौरजीत, कोकिला, आर्का, अनमोल, पुनीत, आदी जातीच्या आंब्यांचा समावेश आहे. नर्मदा किनारी असलेल्या खडकाळ जमिनीवर संकल्प परिहारने या आमराया विकसित केल्या आहेत.

टॅग्स :Mangoआंबा