शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Stampede : "१०-१२ लोक विषारी स्प्रे घेऊन..."; भोले बाबांच्या वकिलाचा दावा, हाथरस चेंगराचेंगरीची नवी थिअरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 10:27 IST

Hathras Stampede : हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीबाबत भोले बाबांचे वकील एपी सिंह यांनी मोठा दावा केला आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीबाबत भोले बाबांचे वकील एपी सिंह यांनी मोठा दावा केला आहे. या दुर्घटनेमागे नवीन थेरी मांडताना ते म्हणाले की, "काही लोकांकडे विषारी स्प्रे होता. त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच चेंगराचेंगरी होऊन अनेकांना जीव गमवावा लागला. या प्रकरणात बाबांच्या सत्संगाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे."

रविवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना भोले बाबांचे वकील एपी सिंह यांनी आरोप केला की, भोले बाबांची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन ही संपूर्ण घटना एका षड्यंत्राचा भाग म्हणून घडवून आणण्यात आली आहे. "२ जुलै रोजी हाथरस सत्संगाच्या वेळी काही लोकांनी गर्दीत विषारी पदार्थ असलेले कॅन उघडले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली."

"१०-१२ लोक विषारी स्प्रे घेऊन सत्संगात आले होते. ते विषारी स्प्रे मारून पळून गेले आणि हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचं दिसतं. हे सर्व लोक गाडीतून पळून गेले. अनेक लोक त्यात बेशुद्ध पडले, मी विशेष तपास पथकाला (एसआयटी) विनंती करतो की, या घटनेमागे कोण आहेत याचा तपास करा. घटनेपूर्वी आणि नंतरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावेत, तरच सूत्रधारांचा शोध लागेल. ही दुर्घटना नाही तर हत्या आहे" असं वकिलाने म्हटलं आहे. 

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सूरजपाल उर्फ ​​भोले बाबा यांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये १२१ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश महिला होत्या. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला अटक केली आहे. याशिवाय आणखी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी सत्संग आयोजन समितीचे सदस्य होते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश