शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

Hathras Gangrape : आता भाजपाच्या माजी आमदाराने आयोजित केली पंचायत, पीडित कुटंबावरच केले आरोप

By बाळकृष्ण परब | Updated: October 4, 2020 16:59 IST

हाथरस बलात्कार प्रकरणावरून मोठ्या प्रमाणात राजकारणही खेळले जात आहे. यादरम्यान, आज हाथरसमध्ये एक पंचायतही बोलावण्यात आली होती.

ठळक मुद्देभाजपाचे माजी आमदार राजवीर सिंह पलहवान यांनी बोलावली होती ही पंचायत १४ सप्टेंबर रोजी संबंधित तरुणी आणि तिचा भाऊ पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आले होते. मात्र त्यावेळी माध्यमांनी दखल घेतली नव्हतीनंतर प्रसारमाध्यमे आणि इतर राजकीय पक्षांच्या लोकांनी या कुटुंबाला भडकवले

हाथरस ( उत्तर प्रदेश) - हाथरस येथील एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान, या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणात राजकारणही खेळले जात आहे. आज एकीकडे हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यासाठी एसआयटीचे पथक पुन्हा एकदा दाखल झाले. तर दुसरीकडे विविध पक्षांचे नेतेही या कुटुंबाची भेट घेण्यासाठी येत आहेत. यादरम्यान, आज हाथरसमध्ये एक पंचायतही बोलावण्यात आली होती.मिळालेल्या माहितीनुसार ही पंचायत भाजपाचे माजी आमदार राजवीर सिंह पलहवान यांनी बोलावली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी योगी सरकारने जे आदेश दिले आहेत त्यामुळे प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होईल, असा दावा या पंचायतीत करण्यात आला. ज्या दिवशी ही घटना घडली त्यानंतर बलात्कार झाल्याचे चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात आले, ही माहिती चुकीची आहे, असे राजवीर सिंह पलहवान यांनी सांगितले.राजवीर सिंह म्हणाले की, आम्ही राज्य सरकारला सांगितले की, दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी झाले पाहिजे. यासाठी सर्वांची नार्को चाचणी झाली पाहिजे. सीबीआय तपासाचा आदेश आला पाहिजे. आम्ही राज्य सरकारकडे ही मागणी केली होती. आम्ही राज्य सरकारकडे ही मागणी केली होती. आता या पंचातीमध्ये जमलेले लोक प्रदेश सरकारच्या निर्णयावर समाधानी आहेत, असे राजवीर सिंह यांनी सांगितले. सरकारचे आभार मानण्यासाठी ही पंचायत बोलावली आहे, असेही ते पुढे म्हणाले.१४ सप्टेंबर रोजी संबंधित तरुणी आणि तिचा भाऊ पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आले होते. मात्र त्यावेळी माध्यमांनी दखल घेतली नव्हती. पण नंतर प्रसारमाध्यमे आणि इतर राजकीय पक्षांच्या लोकांनी या कुटुंबाला भडकवले. तीन दिवसांनंतर साक्ष बदलवण्यात आली. त्यानंतर दर तीन दिवसांनी साक्षी बदलत गेल्या आणि माध्यमे टीआरपीसाठी बातम्या चालवत राहिले, असे राजवीर सिंह म्हणाले. दरम्यान, राजवीर सिंह यांनी सामूहिक बलात्काराचे वृत्तही फेटाळून लावले. मागासवर्गीय समाजातील एका तरुणीला मारहाण झाल्याची खोटी माहिती पसरवून हाथरसला बदनाम करण्यात आले, असा दावाही त्यांनी केला."मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधानयाच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक विधान केलं आहे. उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत. हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. "आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना शासन आणि तलवारी रोखू शकत नाहीत" असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये रामराज्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचं कारण काय? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारBJPभाजपाPoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेश