शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

निर्भयाच्या गुन्हेगारांची वकिली करणारे एपी सिंह लढवणार हाथरसमधील आरोपींचा खटला

By बाळकृष्ण परब | Updated: October 5, 2020 23:53 IST

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा खटला निर्भयाच्या गुन्हेगारांची वकिली करणारे वकील एपी सिंह लढवणार असल्याचे वृत्त आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. तर उत्तर प्रदेशात परकीय फंडिंगच्या माध्यमातून जातीय दंगल करण्याचे कारस्थान आखले जात असल्याचा दावा सरकारकडून येत आहे. या घटनेमुळे एकीकडे मागासवर्गीयांची एकजूट होत असतानाच काही संघटना आरोपींचा बचाव करण्यासाठी पुढे येत आहेत.दरम्यान, या प्रकरणातील आरोपींचा खटला निर्भयाच्या गुन्हेगारांची वकिली करणारे वकील एपी सिंह लढवणार असल्याचे वृत्त आहे. आरोपींचे वकील म्हणून एपी सिंह यांची नियुक्ती अखिल भारतीय क्षत्रिय महासभेने केली आहे. माजी केंद्रीय मंत्री राजा मानवेंद्र सिंह यांनी एपी सिंह यांना हाथरसमधील आरोपींचा खटला लढण्यास सांगितले आहे. मानवेंद्र सिंह यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की अखिल भारतीय क्षत्रिय महासभा पैसे गोळा करून वकील एपी सिंह यांची फी भरणार आहे.हाथरस बलात्कार प्रकरणामधून एससी-एसटी अ‍ॅक्टचा दुरुपयोग करून सवर्ण समाजाला बदनाम केले जात आहे. या प्रकारामुळे राजपूत समाज मोठ्या प्रमाणावर दुखावला गेला आहे. त्यामुळे या प्रकरणात सत्य समोर आणण्यासाठी आरोपींच्या वतीने एपी सिंह यांना वकील म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये आयोपींच्या कुटुंबांच्यावतीनेसुद्धा एपी सिंह यांना वकिली करण्यास सांगण्यात आले आहे.

 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश