शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ईशा फाउंडेशनतर्फे १० हजार सैनिकांना हठयोगाचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 09:02 IST

खूप जास्त तणाव व कठीण परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या सैनिकांचे सर्वांगीण कल्याण घडवून आणणे हे या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे.

नवी दिल्ली: ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ईशा फाउंडेशनने ‘तणाव व्यवस्थापन आणि सर्वांगीण कल्याणासाठी योग’ हा कार्यक्रम भारतीय सैन्याच्या दक्षिण कमांडच्या मदतीने सुरू केला आहे. याअंतर्गत  नऊ राज्यांमध्ये २३ ठिकाणी दहा हजार सैनिकांना शास्त्रीय हठयोग प्रशिक्षण देण्यात येईल.  खूप जास्त तणाव व कठीण परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या सैनिकांचे सर्वांगीण कल्याण घडवून आणणे हे या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करताना ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी व्हिडीओ संदेशाद्वारा म्हटले की, ‘सैनिक म्हणून तुम्ही शारीरिक क्षमतेसाठी पुरेशी मेहनत घेतलेली आहे पण एका वेगळ्या प्रकारच्या मानसिक आणि ऊर्जा स्तरावरच्या क्षमतेसाठी तुम्हाला योग अभूतपूर्वपणे उपयुक्त ठरेल. योगाद्वारे तुमचे अगदी मूलभूत स्तरावर कल्याण साधले जाईल. आम्ही यापूर्वीही विविध योग हजारो सैनिकांना शिकवले असून, ३०० पेक्षा जास्त सैनिकांना प्रशिक्षक म्हणून देखील तयार केले आहे. सैन्याचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या दक्षिण कमांडला आता आम्ही प्रशिक्षण उपलब्ध करीत आहोत. दक्षिण कमांडचे लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी  या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांनी याप्रसंगी भारतीय सैन्याच्या मानसिक आरोग्यासाठी योग कसा महत्त्वपूर्ण राहील यावर भाष्य केले.

 

टॅग्स :Yogaयोगासने प्रकार व फायदे