शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू-मुस्लिम विवाहितांची अपत्ये औरसच- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 05:33 IST

हिंदू स्त्री आणि मुस्लिम पुरुष यांच्या विवाहातून होणारी मुलेही कायद्याच्या दृष्टीने औरसच असतात व आई/वडिलांच्या मृत्यूनंतर ती त्यांच्या मालमत्तेचे वारसदार ठरतात, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली : हिंदू स्त्री आणि मुस्लिम पुरुष यांच्या विवाहातून होणारी मुलेही कायद्याच्या दृष्टीने औरसच असतात व आई/वडिलांच्या मृत्यूनंतर ती त्यांच्या मालमत्तेचे वारसदार ठरतात, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. केरळमधून आलेल्या एका अपिलावर हा निकाल देताना न्या. एन.व्ही. रमणा व न्या. मोहन शांतनागोदूर यांच्या खंडपीठाने म्हटले की, इस्लामी धार्मिक कायद्यानुसार मुस्लिम पुरुषाने मूर्तिपूजक (हिंदू) किंवा अग्निउपासक (झोराष्ट्रियन) स्त्रीशी विवाह केल्यास, असा विवाह अवैध (बातील) नव्हे, तर फक्त अनियमित (फासीद) ठरतो. अशा परधर्मीय पत्नीने नंतर इस्लामचा स्वीकार केल्यावर आधी अनियमित असलेल्या त्यांच्या विवाहास वैधता प्राप्त होते.न्यायालयाने असेही म्हटले की, मुस्लिम पुरुषाच्या अन्य धर्माच्या पत्नीने इस्लाम धर्म स्वीकारला नाही किंवा ती मुसलमान होण्याआधी तिला मूल झाले तरी असे मूल त्या दाम्पत्याने औरस अपत्य ठरते. म्हणजेच इस्लामी कायदा वैध व अनियमित, अशा दोन्ही प्रकारच्या विवाहातून झालेल्या संततीस औरसपणाचा समान हक्क देते.मोहम्मद सलीम नावाच्या व्यक्तीने त्याचे वडील मोहम्मद इलियास व आजी झैनाम बिवी यांच्या निधनानंतर चुलता व चुलत भावंडांविरुद्ध मालमत्तेत हिस्सा मिळविण्यासाठी दिवाणी दावा दाखल केला. वडिलांच्या व त्यांना त्यांच्या आईकडून वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तांमध्ये तो हिस्सा मागतहोता.मोहम्मद सलीमची आई वलिअम्मा विवाह झाला तेव्हा हिंदू होती. कालांतराने तिने धर्मांतर करून सऊदाबिवी, असे नाव धारण केले; परंतु मोहम्मद सलीमचा जन्म आईच्या धर्मांतराच्या आधी झालेला होता. या मुद्यावरून चुलता व चुलत भावंडांनी सलीमला हिस्सा देण्यास विरोधकेला.>दिले इस्लामी कायद्याचे दाखलेप्रतिवादींचे म्हणणे होते की, मोहम्मद सलीम हा हिंदू आईच्या पोटी जन्माला आल्याने तो मोहम्मद इलियास यांचा औरस मुलगा नाही. त्यामुळे त्याला वडिलांच्या किंवा त्यांना वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेत हिस्सा मागण्याचा अधिकार नाही. मात्र, न्यायालयाने मुल्ला, सैयद अमीर अली, ताहीर महमूद आणि ए.ए.ए. फैजी यांच्यासारख्या इस्लामी धार्मिक कायद्यांच्या ख्यातनाम भाष्यकारांचे संदर्भ घेऊन न्यायालयाने प्रतिवादींचे म्हणणे अमान्य करीत वरीलप्रमाणे निकाल दिला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय