शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हाशिमपुरा नरसंहार प्रकरण : 42 जणांच्या हत्येप्रकरणी 16 पीएसी जवानांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 15:11 IST

1987मध्ये मेरठमधल्या हाशिमपुरा इथल्या नरसंहार प्रकरणातील दिल्ली उच्च न्यायालयानं तीस हजारी न्यायालयाचा निर्णय बदलत 16 आरोपी पीएसी जवानांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

लखनऊ- 1987मध्ये मेरठमधल्या हाशिमपुरा इथल्या नरसंहार प्रकरणातील दिल्ली उच्च न्यायालयानं तीस हजारी न्यायालयाचा निर्णय बदलत 16 आरोपी पीएसी जवानांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 31 वर्षांपूर्वी मे 1987मध्ये मेरठमधल्या हाशिमपुरामध्ये 42 लोकांची हत्या करण्यात आली होती. 21 मार्च 2015 कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या निर्णयात 16 आरोपी संशयित असल्याचं सांगत त्यांची सुटका केली होती. त्यावेळी आरोपी असलेल्या पीएसी जवानांविरोधात सबळ पुरावे नसल्याचं कारण देत तीस हजारी न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.या निर्णयाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, इतर पीडितांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर  भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी याचिका दाखल करत तत्कालीन मंत्री पी. चिदंबरम यांच्या भूमिकेवर संशय घेत चौकशी करण्याची मागणी केली होती. दिल्ली उच्च न्यायालयानं 6 सप्टेंबर रोजी सुनावणी पूर्ण करत निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर या प्रकरणात आज दिल्ली उच्च न्यायालयानं निर्णय देत 16 आरोपींना दोषी ठरवलं आहे. यातील दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे. काय आहे हाशिमपुरा हत्या प्रकरण?मेरठच्या हाशिमपुरामध्ये 22 मे 1987मध्ये 42 मुसलमान तरुणांची पीएसीच्या जवानांनी निर्दयीपणे हत्या केली होती. 2015 रोजी या प्रकरणात निर्णय आला, त्यावेळी तीस हजारी न्यायालयानं पुराव्यांअभावी आरोपींची सुटका केली. प्रत्यक्षदर्शीच्या मते, 22 मे 1987च्या रात्री पीएसीच्या जवानांनी हाशिमपुरा आणि आजूबाजूच्या परिसरात तपास आणि अटकसत्र सुरू केलं. त्यावेळी त्यांनी 644 मुस्लिमांना अटक केली होती. त्यात मुस्लिम समाजातील 150 तरुण मुलांचा समावेश होता. त्यातील 50 तरुण मुस्लिमांना पीएसीच्या ट्रकमध्ये भरण्यात आलं. त्यानंतर त्यांची गोळ्या घालून हत्या करत त्यांचे मृतदेह मुरादनगरमधल्या गंग नहर आणि गाझियाबादच्या हिंडन नहरमध्ये फेकून दिले. त्यातील पाच जणांना स्वतःची जीव वाचवण्यात यश आलं.