शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

"हुकूमशाहीपुढे झुकलेलो नाही आणि झुकणारही नाही", राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 14:20 IST

Congress Frozen Account Row : आयटी न्यायाधिकरणाकडून दिलासा मिळाल्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Congress Frozen Account Row : (Marathi News) नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती आयकर विभागाकडून गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आयटी न्यायाधिकरणाकडून काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. काँग्रेसची बँक खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. तसेच, या प्रकरणाची सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी आयटी न्यायाधिकरणात होणार आहे. दरम्यान, आयटी न्यायाधिकरणाकडून दिलासा मिळाल्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यासंदर्भात राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले, "घाबरू नका नरेंद्र मोदीजी, काँग्रेस हे पैशाच्या सत्तेचे नाव नाही तर लोकांच्या सत्तेचे नाव आहे. हुकूमशाहीपुढे झुकलेलो नाही आणि झुकणारही नाही. भारताच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता मनापासून लढेल. "

दरम्यान, याआधी काँग्रेसने आरोप केला होता की, पक्षाची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत. काँग्रेस नेते अजय माकन यांनी हा आरोप केला होता. अजय माकन यांनी दावा केला होता की, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही दिवस आधी २०१८-१९ च्या आयकर रिटर्नच्या आधारे काँग्रेसची अनेक बँक खाती गोठवण्यात आली होती आणि २१० कोटींच्या वसुलीची मागणी करण्यात आली होती. ही फक्त काँग्रेसचीच खाती फ्रीज केली नाहीत, तर आपल्या देशाची लोकशाही फ्रीज केली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. 

पुढची सुनावणी बुधवारी होणारअजय माकन म्हणाले, 'आम्ही आयकर अपीलीय न्यायाधिकरणात याचिका दाखल केली आहे, त्यावर सुनावणी सुरू आहे आणि आमच्या वतीने ज्येष्ठ वकील विवेक तंखा उपस्थितीत आहेत.'बुधवारपर्यंत काँग्रेसच्या खात्यांवरील बंदी उठवण्यात आली आहे.  आम्ही आमची बाजू आयकर अपील न्यायाधिकरणासमोर मांडली. आता काँग्रेसची सर्व खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत, पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.

नऊ खाती गोठवण्यात आला होतीयाआधी अजय माकन म्हणाले होते की, पक्षाच्या युवा शाखा इंडियन युथ काँग्रेसच्या खातीही गोठवण्यात आली आहेत. आतापर्यंत एकूण नऊ खाती गोठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अजय माकन म्हणाले, 'भारतात लोकशाही धोक्यात आहे, १४ फेब्रुवारी रोजी आम्हाला माहिती मिळाली की आम्ही जारी करत असलेले धनादेश बँका स्वीकारत नाहीत. आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला कळले की देशातील प्रमुख विरोधी पक्षाची खाती गोठवण्यात आली आहेत. आता बुधवारपर्यंत ही खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस