शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

UPSC EXAM: प्रेरणादायी कहाणी! चार वर्षांच्या मुलाची आई अनू कुमारी यूपीएससी परीक्षेत आली दुसरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 08:49 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) निकाल जाहीर झाला असून, अनु कुमारी या देशात दुस-या आल्या आहेत. विशेष म्हणजे अनु कुमारी यांननी इन्श्युरन्स कंपनीतील नोकरी लाथाडत यूपीएससीची परीक्षा दिली आणि त्यांनी या परीक्षेत दुस-या येण्याचा मान मिळवला. परंतु एवढ्यावर त्यांची कहाणी थांबत नाही.

चंदीगड- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा (यूपीएससी) निकाल जाहीर झाला असून, अनू कुमारी या देशात दुस-या आल्या आहेत. अनू कुमारी यांनी इन्श्युरन्स कंपनीतील नोकरी लाथाडत यूपीएससीची परीक्षा दिली आणि त्यांनी या परीक्षेत दुस-या येण्याचा मान मिळवला. परंतु एवढ्यावर त्यांची कहाणी थांबत नाही. 31 वर्षीय अनू कुमारी हरियाणातल्या सोनीपतमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांचं लग्न झालं असून, त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे.अनू यांनी कुटुंब सांभाळत एवढं मोठं यश संपादन केल्यामुळे त्यांचं सर्वच स्तरांतून कौतुक केलं जातंय. अनू यांना भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू व्हायचं असून, महिला सक्षमीकरणासाठी त्यांना काम करण्याची इच्छा आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडून यूपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2016मध्येही त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली होती. परंतु त्यावेळी त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. आताच्या परीक्षेत त्या उत्तीर्ण होऊन दुस-या आल्या आहेत.मी या परीक्षेसाठी कोणताही क्लास लावला नव्हता. माझा ध्येय स्पष्ट होतं आणि मी ते साध्य केलं, असं अनूनं एका वृत्तवाहिनीला सांगितलं. अनू यांचे पती उद्योगपती आहेत. अनु यांनी दिल्ली विद्यापीठातून भौतिक शास्त्रात पदवी प्राप्त केली, तर नागपूरच्या आयएमटीमधून त्यांनी एमबीए पूर्ण केले. अनु यांनी तब्बल नऊ वर्षे खासगी कंपनीत काम केले. पण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अखेर नोकरीला रामराम ठोकत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि आज त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) परीक्षेत दुस-या आल्या आहेत. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग