शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वर्णिका कुंडू माझ्या मुलीसारखी, सुभाष बराला यांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 18:33 IST

हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला यानं चंदीगडमधल्या सेक्टर 9 येथून जात असताना वर्णिका कुंडू या मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढली होती

चंदीगड, दि. 8 - हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला यानं चंदीगडमधल्या सेक्टर 9 येथून जात असताना वर्णिका कुंडू या मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढली होती. मुलाच्या या कृत्यामुळे सुभाष बराला यांनाही विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. आता सुभाष बराला यांनी वर्णिका कुंडू ही माझ्या मुलीसारखी आहे, असं म्हटलं आहे.मुलाला वाचवण्यासाठी मी कोणतेही प्रयत्न करणार नाही. तसेच कायद्यानुसार त्याला शिक्षा होईल, असंही बराला म्हणाले आहेत. या प्रकरणात पहिल्यांदाच सुभाष बराला यांनी सार्वजनिकरीत्या प्रतिक्रिया दिलीय. कायदा आपलं काम करतोय. तसेच भाजपा हा महिलांचे अधिकार आणि स्वातंत्र्यासाठी आवाज उठवणारा पक्ष असल्याचंही ते म्हणाले आहेत. वर्णिका माझ्या मुलीसारखी असून, मुलाला वाचवण्यासाठी मी कोणतेही प्रयत्न केले नाहीत आणि करणारही नाही, असं बराला यांनी स्पष्ट केलं आहे.  चंदीगडमधील सेक्टर 9 येथून जात असताना वर्णिका कुंडू या मुलीचा दोन जणांनी पाठलाग करून तिच्यासोबत छेडछाड केल्याची घटना घडली होती. तेव्हा एक टाटा सफारी कार पाठलाग करीत आहे, असे तिच्या लक्षात आले. तिने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिसांनी दोघांना अटक केली, तेव्हा ते दोघेही दारूच्या नशेमध्ये होते. हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याने हा सगळा प्रकार केला होता. याप्रकरणी त्याला अटक झाली पण नंतर जामीन मिळाला. वर्णिका ही हरिणायाच्या आयएएस अधिका-याची मुलगी आहे. या प्रकरणी वर्णिका कुंडू हिने या संपूर्ण घटनेवर उत्तर दिलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी विकास बराला याला नशेत आकंठ बुडालेला गुंड म्हणत त्याच्याविरोधात याचिका दाखल करण्याची घोषणा केली होती. कुरुक्षेत्रातील भाजपाचे खासदार राजकुमार सैनी म्हणाले, बराला यांनी पक्ष कारवाईची वाट न पाहता तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. भाजपानंच बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा दिला आहे. हा कोणत्याही साधारण व्यक्तीवर नव्हे, तर पार्टी अध्यक्षाच्या मुलावर आरोप लावण्यात आला आहे. बराला यांनी तात्काळ पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे.तर भाजपाचे खासदार किरण खेर म्हणाले, कोणालाही एखाद्या मुलीला घाबरवण्याचा कोणताही अधिकार नाही. काँग्रेसही या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. काँग्रेसनं हरिणायाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालय हरियाणा भाजपाचे अध्यक्ष आणि त्यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. चंदीगड सरकार आणि पोलीस दोन्ही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत आहे, असंही काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले आहेत. त्यामुळे विकास बराला याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात पोलिसांवरही नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप केला जातोय. पोलिसांनी या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी कायदेशीर सल्ल्याची मागणी केली आहे