शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणा पोलिसांना मिळाली राम रहीमला तुरुंगातून पळवण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 12:41 IST

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिमला तुरुंगातून पळवण्यासाठी हरियाणा पोलिसांना धमकीचा फोन आला आहे.

हरियाणा- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिमला तुरुंगातून पळवण्यासाठी हरियाणा पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. हरियाणाचे डीजीपी बी. एस. संधू यांना एका निनावी व्यक्तीनं फोन करत रोहतकमधल्या सुनारिया तुरुंगात कैद असलेल्या गुरुमीत राम रहिमला तुरुंगातून पळून जाण्यास मदत करा, अशी धमकी दिली आहे. तसेच राम रहिमची तुरुंगातून सुटका करा, अशीही धमकीवजा मागणही त्या व्यक्तीनं केली आहे. तुम्ही राम रहिमची 72 तासांत सुटका न केल्यास त्याला आम्ही तुरुंगातून पळवून नेऊ, असंही आव्हानही त्या निनावी फोन करणा-या व्यक्तीनं पोलिसांना दिलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस महासंचालकांनी राज्याचे गृहसचिव एस. एस. प्रसाद व मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना धमकीच्या फोनचीही माहिती दिली आहे. मात्र संधू यांनी सार्वजनिकरीत्या असा फोन आल्याचं वृत्त फेटाळलं आहे. संधू यांना रविवारी मध्यरात्री हा फोन आला होता. हरिणायातील सायबर क्राइम पोलिसांनी लोकेशन ट्रेस केल्यानंतर समजलं की, सिमकार्ड ब्रिटनचं असलं तरी फोन चंदीगड सेक्टर 11मधून आला होता. ज्या नंबरवरून फोन करण्यात आला तो नंबर सध्या बंद आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालक व गृहसचिवांनी सुनारिया तुरुंगाच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. पोलीस महासंचालकांनी वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक घेतली असून, रोहकतच्या डीसी, एसपी व जेल अधीक्षकांना आवश्यक सूचना जारी केली आहे. तसेच तुरुंगाचे संचालक डॉ. के. पी. सिंह यांच्याशीही या फोनसंदर्भात संधू यांनी चर्चा केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम याला दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या त्याला रोहतक येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राम रहिम तुरुंगात काम करत असेल, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. मात्र, त्याला तुरुंग प्रशासनाने भाजी लागवडीचे काम दिले आहे. यासाठी त्याला दिवसातील 8 तास काम केल्याबद्दल 20 रुपयांची मजुरी मिळणार आहे.परिसरात छोटीशी जमीन आहे. त्याठिकाणी राम रहिम भाजीपाला लागवडीचे काम करणार असल्याची माहिती तुरुंग  विभागाचे महासंचालक के. पी. सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, राम रहिमने आधीच भाजीपाला लागवडीच्या कामाची जबाबदारी स्वीकारली आहे. जे काही भाजीपाल्याचे उत्पादन राम रहिम घेईल, त्याचा उपयोग तुरुंगातील मेसमध्ये करण्यात येणार आहे. याचबरोबर, त्याच्याकडे तुंरुग परिसरात असलेल्या झाडांची छाटणी करण्याचेही काम देण्यात आले आहे. त्यामुळे त्यासाठी त्याला रोज आठ तासांसाठी 20 रुपयांचा मोबदला मिळणार आहे. त्याला देण्यात आलेले हे काम अकुशल कामकाजाच्या वर्गात मोडते. तसेच, त्याला कोणतीही व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात नाही. इतर कैद्यांप्रमाणेच त्याला ठेवण्यात आले आहे, असेही  के. पी. सिंह म्हणाले. 

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीम