शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

दिल्ली, पंजाबनंतर आणखी एका राज्यात आपने मारली मुसंडी, भाजपाला दिला जबरदस्त धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 14:40 IST

Haryana Panchayat Election Result: दिल्ली आणि पंजाबनंतर आता आणखी एका राज्यात आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत भाजपाला धक्का दिला आहे. आम आदमी पक्षाने हरिणायातील पंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या अनेक जागांवर आम आदमी पक्षाने विजय मिळवला आहे.

चंडीगड - अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेत भाजपाचं टेन्शन वाढवलं आहे. दरम्यान, दिल्ली आणि पंजाबनंतर आता आणखी एका राज्यात आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत भाजपाला धक्का दिला आहे. आम आदमी पक्षाने हरिणायातील पंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या अनेक जागांवर आम आदमी पक्षाने विजय मिळवला आहे. 

हरियाणामधील पंचायत निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. या निकालामध्ये भाजपा, आम आदमी पक्ष आणि आयएनएलडीच्या उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या अनेक जागांवर विजय मिळवला. त्याबरोबरच अनेक अपक्षांनीही विजय मिळवला. हरियाणामधील सत्ताधार भाजपाने सात जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या १०२ जागांपैकी २२ जागा जिंकल्या. यमुनानगर, अंबाला आणि गुरुग्राममध्ये भाजपाने जागा जिंकल्या. मात्र पंचकुला जिह्यात भाजपाला १० जागांवर पराभव पत्करावा लागला. 

आम आदमी पक्षाने या निवडणुकीतील कामगिरीतून सर्वांना धक्का दिला. आपने सिरसा, अंबाला, यमुनानगर आणि जिंदसह इतर जिल्ह्यात मिळून १५ जागा जिंकल्या. आम आदमी पक्षाने जिल्हा परिषदेच्या सुमारे १०० जागांवर उमेदवार दिले होते.

दरम्यान, आनएनएलडीने ७२ जागा लढवून त्यापैकी १४ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसने चिन्हावर निवडणूक लढवली नव्हती. मात्र पक्षाने ज्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. त्यापैकी अनेकांनी विजय मिळवला. तसेच अनेक अपक्षही निवडून आले आहेत.  

टॅग्स :AAPआपHaryanaहरयाणाBJPभाजपाElectionनिवडणूक