शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणा! पहिल्यांदाच आमदार झालेल्या आरती यांना मंत्रीपद; केंद्रीय मंत्र्याच्या मुलीने घेतली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 16:37 IST

Nayab Singh Saini takes oath as Haryana Chief Minister : हरयाणात पुन्हा एकदा भाजपने सरकार स्थापन केले.

Haryana New Government : हरयाणात भाजपने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. नायब सिंह सैनी यांनी पुन्हा एकदा हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नायब सैनी दुसऱ्यांदा हरयाणाचे मुख्यमंत्री बनले आहेत. हरयाणाच्या नव्या सरकारमध्ये एका उपमुख्यमंत्र्यांसह १३ मंत्री करण्यात आले आहेत. खरे तर अटेली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेल्या आरती राव यांना नायब सिंह सैनी यांच्या सरकारमध्ये मंत्री करण्यात आले आहे. आरती सिंह राव या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या दुसऱ्या महिला मंत्री ठरल्या. केंद्रीय मंत्री इंद्रजीत राव सिंह यांची कन्या आरती राव या अटेली मतदारसंघातून निवडून आल्या आणि प्रथमच आमदार झाल्या. 

इंद्रजीत राव सिंह हे पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. आरती राव दीर्घकाळापासून हरयाणा भाजपमध्ये सक्रिय होत्या. त्या खेळाडूही राहिल्या आहेत. मागच्या वेळीही त्यांनी तिकीट मागितले होते पण ते मिळू शकले नाही. यावेळी अटेली या मतदारसंघातून त्यांनी आमदार होण्याचा मान पटकावला. आरती राव यांच्या नावावर ६६ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे दिल्लीत ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दोन फ्लॅट आहेत. ७७ लाखांहून अधिक किमतीचे सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिनेही आहेत. पण त्यांच्या नावावर कोणत्याही वाहनाची नोंद नाही. 

दरम्यान, नायब सिंह सैनी यांनी गुरुवारी पंचकुलामध्ये एका भव्य समारंभात हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि एनडीएचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. याशिवाय, भाजपाशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित होते. नायब सिंह सैनी यांच्यासह १४ आमदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनिल विज यांनी मंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. तसेच यावेळी दोन महिला आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. केंद्रीय मंत्री इंद्रजीत राव सिंह यांची मुलगी आरती राव आणि माजी मुख्यमंत्री चौधरी बन्सीलाल यांची नात व तोशाम मतदारसंघाच्या आमदार श्रुती चौधरी यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. 

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४