शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंच्या कमाईवर सरकारचा डोळा; म्हणे, 33 टक्के रक्कम करा तिजोरीत गोळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 15:44 IST

सरकारच्या निर्णयावर खेळाडू नाराज

चंदीगढ: हरयाणा सरकारचा आणखी एक निर्णय वादात सापडला आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारनं राज्यातील खेळाडूंना जाहिरातीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा 33 टक्के वाटा सरकारी तिजोरीत जमा करण्याचा आदेश काढला आहे. खेळाडूंकडून मिळणाऱ्या या पैशांचा वापर राज्यातील क्रीडा क्षेत्राला अधिकाधिक सुविधा देण्यासाठी वापरला जाईल, असं सरकारनं म्हटलं आहे.हरयाणा सरकारकडून खेळाडूंना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. या खेळाडूंनी सुट्टी घेतल्यास आतापर्यंत त्यांचा पगार कापला जात नव्हता. मात्र यापुढे खेळाडूंनी सुट्टी घेतल्यास त्यांचा पगार कापला जाईल, असा निर्णय सरकारनं घेतला आहे. एखाद्या खेळाडूनं सरकारच्या परवानगीशिवाय एखाद्या कंपनीची जाहिरात केल्यास किंवा व्यावसायिक स्पर्धेत सहभाग घेतल्यास त्या खेळाडूला त्यामधून मिळणारं सर्व उत्पन्न सरकारच्या तिजोरीत जमा करावं लागेल. हरयाणाचे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधीत्व करतात. राज्याच्या अनेक खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. यामध्ये बॉक्सिर विजेंद्र सिंह, कुस्तीपटू सुशील कुमार, योगेश्वर दत्त, बबिता फोगट, गीता फोगट यांचा समावेश आहे. हरयाणा सरकार याआधीही अनेकदा वादग्रस्त निर्णयांमुळे चर्चेत राहिलं आहे. सार्वजनिक ठिकाणांवर नमाज पढण्यावर बंदी घालण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच हरयाणा सरकारनं घेतला होता. सार्वजनिक जागांवर नमाज पढण्यापेक्षा मशिदीत नमाज पढा, असं त्यावेळी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटलं होतं. हरयाणा सरकारचा हा निर्णय वादग्रस्त ठरला होता.  

टॅग्स :HaryanaहरयाणाSportsक्रीडा