शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: कृषी विधेयकांबद्दल शेतकऱ्यांनी प्रश्न विचारताच भाजपा आमदारानं काढला पळ

By कुणाल गवाणकर | Updated: September 28, 2020 17:24 IST

शेतकऱ्यांची सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी; कृषी विधेयकांबद्दल संताप व्यक्त

चंदीगढ: नुकतंच पार पडलेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन कृषी विधेयकांमुळे गाजलं. राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. माईकची मोडतोड करून उपसभापतींसमोरील नियम पुस्तिकाही फाडली. यानंतर आवाजी मतदानानं राज्यसभेत विधेयकं मंजूर झाली. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना विधेयकांवर स्वाक्षरी न करण्याची विनंती केली होती. मात्र कालच कोविंद यांनी तिन्ही विधेयकांना मंजुरी दिली. सरकारनं मंजूर केलेल्या विधेयकांविरोधात देशभरात लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका भाजपच्या हरयाणातल्या एका आमदाराला बसला. या आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंद्री मतदारसंघाचे आमदार राम कुमार कश्यप यांना शेतकऱ्यांनी घेरलं. त्यांना कृषी विधेयकांबद्दल प्रश्न विचारले. मात्र कश्यप यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गराड्यातून कश्यप यांनी पळ काढला.सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @ramanmann1974 ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आमदार राम कुमार कश्यप शेतकऱ्यांसोबत बोलताना दिसत आहेत. 'शेतकरी आमची मतपेढी आहे. आमची मतं गमावू असं कोणतंही विधेयक आम्ही आणू का?,' असा प्रश्न कश्यप यांनी शेतकऱ्यांना विचारला. यानंतर उपस्थितांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ते पाहून आमदारांनी तिथून पळ काढला.मोदी सरकारनं मंजूर करून घेतलेल्या कृषी विधेयकांविरोधात देशभरात निदर्शनं सुरू आहेत. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरून आपला निषेध व्यक्त करत आहेत. पंजाब, हरयाणामध्ये आंदोलनाचा जोर अधिक आहे. आज सकाळी राजपथावर आंदोलनादरम्यान एका ट्रॅक्टरला आग लावण्यात आली. कर्नाटकमधल्या शेतकरी संघटनांनी आज बंद पाळला आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी ठिय्या मांडला आहे.

टॅग्स :BJPभाजपाFarmerशेतकरी