शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

लोकगीत गायिका हर्षिता दहियाची हरयाणात हत्या, येत होत्या धमक्या; जवळून घातल्या गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 02:01 IST

लोकगीत गायिका हर्षिता दहिया (२२) हिची मंगळवारी हरयाणातील पानिपत जिल्ह्यात अज्ञात इसमांनी गोळ््या घालून हत्या केली. मला नुकतीच काही लोकांनी ठार मारण्याची धमकी दिली होती, असा व्हिडीओ तिने त्या आधी समाजमाध्यमांवर पोस्ट केला होता.

चंदीगढ : लोकगीत गायिका हर्षिता दहिया (२२) हिची मंगळवारी हरयाणातील पानिपत जिल्ह्यात अज्ञात इसमांनी गोळ््या घालून हत्या केली. मला नुकतीच काही लोकांनी ठार मारण्याची धमकी दिली होती, असा व्हिडीओ तिने त्या आधी समाजमाध्यमांवर पोस्ट केला होता.हर्षिता दहिया ही चामरारा (जिल्हा पानिपत) खेड्यात शेतकºयांसाठी झालेल्या कार्यक्रमाहून परतत असताना, तिचे वाहन दोन जणांनी अडविले आणि तिचा गळा व कपाळावर सहा गोळ््या झाडल्या. ती जागीच मरण पावली, असे पोलिसांनी सांगितले.हरयाणातील या उद्योगातील (संगीत, गायन) काही लोक मला फोनवर तडजोड करून घे, म्हणून धमक्या द्यायचे. व्हिडीओ डिलीट करून टाक, अन्यथा परिणामांना तोंड दे, अशी धमकी आपणास आल्याचे दहियाने यू ट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले होते.तिने हा लाइव्ह व्हिडीओ फेसबुकवर १२ आॅक्टोबर रोजी रेकॉर्ड केला होता. त्यात तिने काही लोकांनी तिला विनयभंग करण्याची धमकी दिली होती, असा आरोप केला होता. फेसबुकवर धमक्या देणाºया लोकांची नावे व फोन नंबर्स जाहीर करीन व ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्याची तक्रार देईन, असेही ती म्हणाली होती. परंतु तिने तशी तक्रार दिली की नाही हे स्पष्ट झालेले नाही. फेसबुकवरील लाइव्ह व्हिडीओ मी डिलीट करणार नाही. मृत्यूला मी घाबरत नाही, असे हर्षिता म्हणाली होती. मारेक-यांना पकडण्यासाठी हरयाणा पोलिसांनी दोन तुकड्यांची स्थापना केली आहे व या हत्येमागे वैयक्तिक वैर होते का, याचा तपास ते करीत आहेत. चौकशी सुरू असल्यामुळे आताच काही सांगणे योग्य ठरणार नाही, असे पानिपतचे पोलीस अधीक्षक राहुल शर्मा म्हणाले.मेहुण्यावरच संशयसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षिता दहियाचा मेहुणा दिनेश कुमार याच्यावर पोलिसांचा संशय आहे. २०१३ मध्ये दिनेश कुमारने हर्षितावर बलात्कार केला होता. सध्या तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. तिच्या हत्येमागे त्याचा हात असू शकतो. दिनेश कुमार हा २०१५ मध्ये हर्षिताच्या आईच्या झालेल्या खुनातही आरोपी आहे.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा