शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गायिका हर्षिताच्या हत्येप्रकरणी जावयाला अटक, २०१४ मध्ये हर्षितावर केला होता बलात्कार, आईच्या हत्येतही दिनेशचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 04:21 IST

हरयाणवी गायिका आणि नृत्यांगना हर्षिता दहिया हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा जावई गँगस्टर दिनेश कराला याला अटक केली आहे. या प्रकरणी अन्य चौघांना अटक करण्यासाठी पोलिसांनी धाडसत्र अवलंबले आहे.

- बलवंत तक्षकपानीपत : हरयाणवी गायिका आणि नृत्यांगना हर्षिता दहिया हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा जावई गँगस्टर दिनेश कराला याला अटक केली आहे. या प्रकरणी अन्य चौघांना अटक करण्यासाठी पोलिसांनी धाडसत्र अवलंबले आहे.कराला याला पोलिसांनी झज्जर येथे आणून चौकशी केली. त्याने हत्येची कबुली दिल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दिनेशने पोलिसांना सांगितले की,त्याने २०१४ साली हर्षिताचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणात हर्षिताची आई प्रेमोदेवी मुख्य साक्षीदार होती.साक्ष न देण्यासाठी दिनेश कराला याने प्रचंड दबाव टाकला मात्र प्रेमोदेवी त्याच्या दबावाला बळी पडल्या नाही त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. पोलीस सुत्रानुसार प्रेमोदेवी हत्या आणि हर्षिता बलात्कार प्रकरणाची तारीख जवळ येत असल्याने हर्षिताची देखील हत्या करण्यात आली. करालाच्या सूचनेवरून चौघांनी तिची हत्या केल्याची माहिती उघड झाली आहे. कराला हा गँगस्टर म्हणून ओळखला जात असून त्याच्यावर सोनीपत, जिंद, झज्जर आणि दिल्लीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. हर्षिता एका गावातील कार्यक्रम आटोपून परतत असताना चमराडा या गावी चौघांनी तिची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली.वरिष्ठ पोलीस अधीक्षक राहुल शर्मा यांच्यानुसार इतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. आरोपींची नावे मात्र त्यांनी उघड केली नाही. प्रेमोदेवी आणि हर्षिताची हत्या झाल्यानंतर आता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरोपी दिनेश कराला याची पत्नी आणि मृत हर्षिताची बहीण लता हिने आता पुढाकार घेतला आहे.२०१२ मध्ये तिचा विवाह दिनेशसोबत झाला होता. घरगुती भांडणामुळे ती वेगळी राहायची. तिच्याही जीविताला धोका असू शकतो,हे ठाऊक असताना तिने दिनेशच्या विरोधात आता बंड पुकारला आहे.आईच्या हत्येची होती साक्षीदार....हर्षिताची बहीण लता हिने पती दिनेश याच्यावर आरोप केल्यामुळे तपासाला वेगळे वळण मिळाले. हर्षिताच्या आईची २०१४ मध्ये दिल्लीत हत्या झाली होती. या प्रकरणात ती मुख्य साक्षीदार होती, त्यामुळेच तिचा काटा काढण्यात आल्याचा आरोप लताने केला आहे. त्यावेळी हर्षिता दिल्लीच्या नरेला भागात वास्तव्याला होती.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा